शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

प्रसूती वॉर्ड झाले गोडाउन; दुुरुस्तीचा अद्यापही पत्ताच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 00:07 IST

रुग्णांत संताप, दुरूस्ती झाल्यास आणखी १९ खाटा वाढणार

ठाणे : शासकीय रुग्णालयातील ऐतिहासिक असलेल्या इमारती जीर्ण होण्यास सुरुवात झाल्याने त्या इमारतीचे प्लास्टर बऱ्याच ठिकाणी निखळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील १९ खाटा असलेल्या प्रसूती विभागातील काही ठिकाणी प्लास्टर पडल्याने तो विभाग दुरुस्तीचे कारण देऊन खाली करून तो अन्य विभागांमध्ये स्थलांतरित केला. मात्र, दुरुस्तीच्या नावाखाली रिकामा केलेल्या त्या विभागात दुरुस्तीचा अद्यापही पत्ता नसल्याने तेथे सध्या औषधांचे बॉक्स ठेवले असून त्याला आता गोडाउनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जर हा विभाग दुरुस्त करून दिला, तर आणखी १९ खाटा वाढतील तसेच गादीवर झोपावे लागणाºयांपैकी काही मातांना खाटा उपलब्ध होतील. त्यामुळे तो विभाग लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी दबक्या आवाजात कर्मचाºयांकडूनच होऊ लागली आहे. आधीच या विभागात अपुºया खाटांमुळे माता व नवजात अर्भकांना जमिनीवर झोपवण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे.अपुºया जागेत स्वच्छता कशी ठेवायची?जिल्ह्याचे रुग्णालय म्हणून या रुग्णालयात ठाणे जिल्ह्यासह पालघर या जिल्ह्यातील ग्रामीण भागातून रुग्ण उपचारार्थ येथे येतात. त्यामध्ये ताप असो, विंचू किंवा सर्पदंश असो तसेच प्रसूती असो, यासाठी गोरगरीब रुग्णांची येथे नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते. त्यातच, या रुग्णालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. हे रुग्णालय सुपरस्पेशालिटी करायचे असल्याने तेथे तूर्तास स्थलांतरित करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहे. मात्र, त्याला काही यश येताना दिसत नाही. त्यातच, रुग्णालयातील विविध विभागांत प्लास्टर पडणे, सज्जा तुटणे, असे प्रकार काही दिवसांपासून घडत आहेत.त्याचप्रमाणे प्रसूती वॉर्डमध्ये काही ठिकाणी प्लास्टर पडले. या विभागामध्ये नवजात बालक आणि गरोदर माता असल्याने तो विभाग दुरुस्त केला आणि नीटनेटक्या असलेल्या १४ खाटांच्या विभागात स्थलांतरित केला. पण,या विभागात प्रसूतीनंतर साहित्य धुण्यासाठी पुरेशी जागा नसल्याची बोंब येथील कर्मचारी करत आहेत. त्या अपुºया जागेत साहित्य स्वच्छ करावे लागत आहे. त्यातच, दुरुस्तीच्या नावाखाली प्रसूती वॉर्डला गोडाउनचे स्वरूप दिल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्या विभागाचे गोडाउन केलेले नाही. पावसाळा असल्याने तेथे औषधे ठेवली आहेत. लवकरच त्या विभागाची दुरुस्ती करून तेथे लेबर वॉर्ड सुरू करण्यात येईल. - डॉ. अशोक कांबळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक,जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य