- अजित मांडकेठाणे - ठाणे महापालिकेत निवडणुकीनंतर ‘महिलाराज’ येणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महिलांकरिता ६६, तर पुरुष सदस्यांकरिता ६५ जागा असतील. पुरुषांकरिता असलेल्या खुल्या प्रवर्गातील जागेवर महिला उभ्या राहू शकतात. गेल्या निवडणुकीत काही वॉर्डांतून महिला विजयी झाल्या. त्यांनी यावेळी पुन्हा खुल्या प्रवर्गाकरिता असलेल्या वॉर्डातून निवडणूक लढवली तर महिला सदस्यांची संख्या ६६ हून अधिक होईल.
या आरक्षित जागांवरून ६६ महिला, तर ६५ पुरुष पालिकेवर निवडून जाणार आहेत. याचा अर्थ, ठाणे महापालिकेवर ‘महिलाराज’ येणार असल्याचे चित्र आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झाले. काही ठिकाणी प्रभागांचे आरक्षण काहीसे बदलले असले, तरी बाजूचा वॉर्ड अनेकांनी आधीपासूनच सज्ज ठेवल्याने त्यांना याचा फायदा होणार आहे.
या दिग्गजांना बसला फटकाआरक्षण सोडतीचा फटका शानू पठाण, पूर्वेश सरनाईक, कृष्णा पाटील, देवराम भोईर, सुनील हंडोरे, कविता पाटील अशा दिग्गज माजी नगरसेवकांना बसला. आता आपले राजकीय भवितव्य उज्ज्वल राखण्याकरिता त्यांना त्याच प्रभागातील दुसऱ्या वॉर्डात स्वत:चे पुनर्वसन करवून घ्यावे लागेल.
ठाण्यातील आरक्षणअनुसूचित जातीच्या महिलांकरिता पाच जागा, अनुसूचित जमाती दोन प्रभाग, नागरिकांचा मागास प्रभाग आरक्षण ३५ जागा, नागरिकांचा मागास प्रभाग महिला १८ जागा.
एकूण जागा १३१अनुसूचित जमाती ०३अनुसूचित जाती ०९ओबीसी ३५सर्वसाधारण ८४
Web Summary : Thane Municipal Corporation may see a 'Women's Rule' with 66 seats reserved for women and 65 for men. Some prominent ex-corporators were affected by reservation changes and must seek new wards.
Web Summary : ठाणे महानगरपालिका में 'महिला राज' की संभावना, 66 सीटें महिलाओं के लिए आरक्षित, 65 पुरुषों के लिए। आरक्षण परिवर्तन से कुछ प्रमुख पूर्व पार्षदों को नुकसान, नए वार्ड खोजने होंगे।