शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्या महेश पाटील यांच्यासह दोघांची न्यायालयात शरणागती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 21:02 IST

केडीएमसीचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेले भाजपा नगरसेवक महेश पाटील यांच्या सह अन्य दोघांनी शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात शरणागती पत्करली.

कल्याण  - केडीएमसीचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेले भाजपा नगरसेवक महेश पाटील यांच्या सह अन्य दोघांनी शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात शरणागती पत्करली. दरम्यान या तिघांचा ताबा ठाणे खंडणी विरोधी पथकाने घेतला असून त्यांना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे . १३ डिसेंम्बर ला ठाणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा जणांना एका दरोड्याच्या तपासात अटक केली होती या आरोपींकडे केलेल्या तपासात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी नगरसेवक महेश पाटील यांनी दिल्याची माहिती  उघडकीस आली . या प्रकरणी २१ डिसेंबर ला महेश पाटील यांच्या विरोधात ठाणे ग्रामीण च्या गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . हत्येचा कट हा डोंबिवलीत शिजल्याने हा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे . याचा तपास ठाणे खंडणी विरोधी पथका कडून सूरु आहे . दरम्यान आरोपी महेश पाटील यांच्यासह सुजित नलावडे ,विजय बाकाडे यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीनासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज १२ जानेवारीला झालेल्या सुनावणीत फेटाळून लावण्यात आला .या विरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने २२जानेवारी पर्यंत शरण जावा असे आदेश दिले होते . त्यानुसार शुक्रवारी तिघे आरोपी कल्याण न्यायालयात हजर झाले . दरम्यान शरणागती पत्करलेल्या तिन्ही आरोपींचा ताबा ठाणे खंडणी विरोधी पथकाने घेतला आहे .

टॅग्स :Crimeगुन्हाBJPभाजपाkalyanकल्याण