शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘अतिक्रमण’चा कार्यभार महेश आहेरांकडे कायम; माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 06:25 IST

ठाणे : महापालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी होईपर्यंत त्यांच्याकडील कार्यभार काढण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु ...

ठाणे : महापालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी होईपर्यंत त्यांच्याकडील कार्यभार काढण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु त्यांच्याकडील आस्थापना विभागाचा कार्यभार काढण्यात आला असला तरी अतिक्रमण विभागाचा कार्यभार तसाच ठेवण्यात आला आहे. हा विधिमंडळाचा अपमान असल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी  राष्ट्रवादीकडून आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात आव्हाड यांची मुलगी व जावई यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मारहाण केली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष चव्हाण यांनी देखील आपल्या कुटुंबियांना आहेर यांच्याकडून धोका असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात अधिवेशनात चर्चा झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल.  त्यांचा पदभार काढण्याचे आश्वासनही अधिवेशनात देण्यात आले होते.

पाठराखण का?

मुख्यमंत्री सांगतात फक्त एकच पदभार काढा, विधिमंडळाच्या कामकाजात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप केला, असा आरोप आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्री आहेर यांची इतकी पाठराखण का करत आहेत, असा सवालही त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका