शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

उल्हासनगरमध्ये महेक इमारत कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:21 IST

उल्हासनगरमधील महेक इमारत मंगळवारी कोसळल्याची घटना समोर आली आहे. खचलेल्या महेक इमारतीमधून सोमवारी 31 कुटुंबाना बाहेर काढण्यात आले होते.

ठळक मुद्देउल्हासनगरमधील महेक इमारत मंगळवारी कोसळल्याची घटना समोर आली आहे.खचलेल्या महेक इमारतीमधून सोमवारी 31 कुटुंबाना बाहेर काढण्यात आले होते. इमारत सीलबंद केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर - उल्हासनगरमधील महेक इमारत मंगळवारी (13 ऑगस्ट) कोसळल्याची घटना समोर आली आहे. खचलेल्या महेक इमारतीमधून सोमवारी 31 कुटुंबाना बाहेर काढण्यात आले होते. ही इमारत सीलबंद केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता इमारत कोसळल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणत प्लॉटधारकांनी परमेश्वरांसह पालिका अधिकाऱ्याचे आभार मानले आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं -3 लिंक रोड येथील पाच मजली महेक इमारतीमधील घरांचे सोमवारी (12 ऑगस्ट) सकाळी 8 वाजता दरवाजे उघडत नव्हते. या प्रकारामुळे घाबरलेल्या लोकांनी महापालिका अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोन करून याबाबत माहिती दिली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी सर्वांचे दरवाजे उघडून लोकांना इमारती बाहेर सुरक्षितरित्या बाहेर काढले. यावेळी इमारत एका बाजूने झुकल्याचे उघड झाले होते. 

पालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी, सहायक आयुक्त भगवान कुमावत यांच्यासह स्थानिक नेते व नगरसेवकांनी गर्दी केली होती. वास्तुविशारद लक्ष्मण कटारिया यांच्यासह इतर तज्ज्ञांनी इमारतीची पाहणी करून एका महिन्यात अहवाल देणार असल्याचे सांगितले होतं. त्यापैकी अनेकांनी इमारतीला धोका नसून लोकांना राहू देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. तसेच स्थानिक बहुतांश नेत्यांनी तशीच भूमिका घेतल्याने पालिका अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला होता.

महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सविस्तर माहिती घेऊन, इमारतीचा अहवाल येई पर्यंत इमारत सीलबंद करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांनी इतरांची मागणी न ऐकता इमारत सीलबंद करून इमारतीमध्ये जाण्यास लोकांना मज्जाव केला होता. महापालिका आयुक्त देशमुख व सहाय्यक आयुक्त कुमावत यांचा निर्णय आज अखेर योग्य ठरून 31 कुटुंबांचा जीव वाचला आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता पाच मजल्याची इमारत कोसळली असून तब्बल 31 कुटुंब बेघर झाली आहेत. कोसळलेल्या इमारतीकडे लोकांनी  सकाळी धाव घेतल्यावर परमेश्वर व पालिकेचे आभार मानले आहेत. 

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटना