खांब कोसळून महावितरणचा कर्मचारी जखमी

By Admin | Updated: March 14, 2017 01:29 IST2017-03-14T01:29:14+5:302017-03-14T01:29:14+5:30

शिरगाव येथे नादुरुस्त झालेला विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढतांना जीर्ण झालेला खांब तुटून झालेल्या अपघातात सातपाटी येथील राजेश मोरे

Mahavitaran's staff collapses in collapse | खांब कोसळून महावितरणचा कर्मचारी जखमी

खांब कोसळून महावितरणचा कर्मचारी जखमी

पालघर: शिरगाव येथे नादुरुस्त झालेला विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढतांना जीर्ण झालेला खांब तुटून झालेल्या अपघातात सातपाटी येथील राजेश मोरे हा विद्युत कर्मचारी जखमी झाला. त्याला उपचारा साठी पालघरच्या खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघर विद्युत महावितरण विभागाच्या सातपाटी कार्यालयातील कर्मचारी मोरे हे शिरगावच्या लक्ष्मी गार्डन रिसॉर्ट जवळील एका ग्राहकांची तक्रार निवारण करण्यासाठी गेले असतांना विद्युतपुरवठा करणाऱ्या लोखंडी खांबावर चढले. मात्र तो खांब खूप जुना,गंजलेला अवस्थेत असल्याने त्यांच्या वजनाने खालून तुटला व कोसळला. त्या झालेल्या अपघातात मोरे हे जखमी झाले.त्यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी वरील गावातील लोखंडी पोल हे ३५ वर्षा पूर्वी पासूनचे जुनाट असून हे बदलून मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यातील काही पोल बदलण्यात आले असले तरी अनेक गंजलेले, वाकलेले, पोल आजही टेकू लावलेल्या परिस्थितीत उभे आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरलेल्या या पोलवरील विद्युत पुरवठ्याबाबत जर तक्रार असेल तर त्या पोलवर चढण्यास कर्मचारी उत्सुक नसतात.अशा वेळी काही ठिकाणी शिडीचा वापर केला जातो. मात्र शिडी नसल्यास नाईलाजाने जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्याना पोलवर चढावे लागते. सातपाटी येथील अनेक खांब कोसळण्याच्या मार्गावर आहेत ते बदलून मिळावेत या साठी कार्यालयात मागील अनेक महिन्यापासून मागणीही करण्यात आली आहे. मात्र त्या मागणीची पूर्तता करण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांसाठी हे जुने खांब जीवघेणे ठरले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Mahavitaran's staff collapses in collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.