शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्टÑ सदनाच्या ठेकेदाराला सरकारचा छदामही मिळाला नाही: चांगली वास्तू उभारुनही झाली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:16 IST

‘महाराष्टÑ सदना’सारखी सुंदर वास्तू उभारण्यात आली. ते उभारणाऱ्या ठेकेदाराला ८०० कोटींपैकी एक छदामही सरकारकडून मिळाला नाही. मग यात भ्रष्टाचार झाला कसा? आपल्याला का अटक झाली हे माहीत नाही? ज्यांनी अटक केली त्यांनाही ते माहीत नाही? अशी खंत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री छगन भुजबळ यांनी ठाण्यातील कार्यक्रमात व्यक्त केली.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांची ठाण्यात खंतअखिल भारतीय माळी समाजाचे ठाण्यात संमेलनदेशभरातील मान्यवरांची उपस्थिती

ठाणे: दिल्लीमध्ये ‘महाराष्टÑ सदना’सारखी सुंदर वास्तू उभारण्यात आली. ते उभारणा-या ठेकेदाराला ८०० कोटींपैकी एक छदामही सरकारकडून मिळाला नाही. मग यात भ्रष्टाचार झाला कसा? जर पैसेच मिळाले नाही तर तो कोणालाही कसले पैसे देईल, असा सवाल करीत आपल्याला का अटक झाली हे माहीत नाही? ज्यांनी अटक केली त्यांनाही ते माहीत नाही? अशी खंत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केली.अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने ठाण्यात माळी समाजाचे देशभरातील बांधवांसाठी राज्यस्तरीय संमेलन तथा अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष डी. के. माळी यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळयाचे रविवारी गडकरी रंगायतन येथे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी डीत्यावेळी त्यांनी समाजाला एकसंघ राहण्याची हाकही दिली. दिल्लीतील महाराष्टÑ सदनाचा ठेका १०० कोटींहून २५ हजार कोटी झाल्याचे बोलले जाते. मग ते दहा हजार कोटींचे झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात ८०० कोटींचे काम असूनही ठेकेदाराने ते १०० कोटींमध्ये पूर्ण केले. मग यात ८५० कोटी रुपये ठेकेदाराने एखाद्या मंत्र्याला देण्याचा प्रश्नच येतो कुठे? जर सरकारकडून ठेकेदाराला एक छदामही न देता त्याचा गेली पाच ते सहा वर्ष अगदी फुकट वापरही होतो आहे. तरीही भ्रष्ट्राचाराचा आरोप करीत आपल्याला नाहक अटक करण्यात आली. खरेतर कोणाला अडकवायचे हे ठरविले जाते, त्यानुसारच यात आपल्याला अडकविण्यात आल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. केस झाल्यानंतर यात मग तारीख पे तारीख सुरु आहे. जो चुकीचे काम करेल त्याला शिक्षा नक्की मिळेल. आपण कोणतेही गैरकृत्य केले नसून ज्याने आपल्यावर अन्याय केला त्याचा वरच्या (ईश्वराच्या) न्यायालयात योग्य न्याय होईल.आपण केवळ माळी म्हणून एकत्र येण्यापेक्षा सर्व इतर मागासवर्गीय समाजाला एकत्र घेऊन राजकारणातही पुढे आले पाहिजे. केवळ दुस-या पक्षात चटया उचलण्याचे काम करुन चालणार नाही, नेतृत्वाचीही फळी उभी केली पाहिजे. अशी साद त्यांनी आपल्या बांधवांना घातली.फुलेंप्रमाणेच डीकेंचेही कार्यज्यावेळी शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड म्हणून काम करणा-या महात्मा ज्योजिबा फुले यांची उद्योेजक म्हणूनही मोठी ओळख होती. टाटांच्या उद्योगाची उलाढाला २० हजारांचा असतांना लेखक आणि कवी म्हणून नावारुपाला आलेल्या फुलेंच्या उद्योगाची उलाढाल ही वर्षाला २० लाखांची होती. सोन्याचे शिक्के बनविण्याची त्यांची एजन्सी होती. हे साम्राज्य असतांनाही त्यांनी समाजकार्यात झोकून देऊन अनन्यसाधारण कार्य केले. अगदी त्याचप्रमाणे ठाण्यातील बापू माळी यांचेही समाजासाठी मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. संघर्षमय आयुष्य जगणा-या माळी यांनी केमिकल कंपनीतील नोकरी, बांधकाम क्षेत्रात काम केले.त्यांना अजून २४० पेक्षा अधिक पोर्णिमांचे दर्शनाबरोबर त्यांच्या हातून चांगले समाजकार्य घडण्याचे त्यांनी अभिष्टचिंतन केले.यावेळी उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री स्वामीप्रसाद मौर्य, सैनी माळी सेवा समितीचे दिलबाग सैनी, उद्योगपती शंकर बोरकर, नेपाळचे माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा, तेलंगणाचे शिवकुमार पेटकुले, माळी समाज ठाणे शहर अध्यक्ष सचिन शिंदे आणि डॉ. राम माळी आदींनीही समाजाला उद्बोधन करीत एकसंघ होण्याचे आवाहन केले. तसेच.डीके यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता लोंढे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकPoliticsराजकारण