शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

Vidhan Sabha 2019: उल्हासनगर मतदारसंघ युतीतील शिवसेनेकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:52 IST

शिवसैनिकांत जल्लोष; आयलानी-कलानी गोटात मात्र पसरली शांतता

- सदानंद नाईक उल्हासनगर : भाजप-शिवसेना युतीच्या वाटाघाटीत उल्हासनगर मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चेने भाजपकडून उमेदवारीसाठी आमने-सामने उभे ठाकलेल्या आयलानी व कलानी गोटात शांतता पसरली आहे. शिवसैनिकांनी मात्र जल्लोष करून पुढील आमदार शिवसेनेचा असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.उल्हासनगर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी आयलानी व कालानी आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यासाठी दोन्ही गटातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत जावून कलानी समर्थंकावर गुन्हे दाखल झाले. मात्र मंगळवारी दुपारी युतीच्या वाटाघाटीत मतदारसंघ भाजप ऐवजी शिवसेनेकडे जात असल्याच्या बातम्या प्रसारित होताच शिवसैनिकांनी जल्लोष केला.शिवसेनेकडे मतदारसंघ आल्यास कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी द्या अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपकडून महापौर पंचम कलानी यांना थेट कामाला लागा, असा आदेश भाजप श्रेष्ठींनी दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. तर कुमार आयलानी यांना उमेदवारी मिळण्यासाठी भाजप निष्ठावंत गटाने थेट वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे.भाजपचे उल्हासनगरवर वर्चस्व राहिले असून पप्पू कलानी यांच्या पूर्वी भाजपचे शितलदास हरचंदानी सलग तीन वेळा आमदारपदी निवडून आले. त्यानंतर पप्पू कलानी सलग चार वेळा निवडून आले. मात्र पाचव्यांदा भाजपच्या कुमार आयलानी यांच्याकडून पप्पू कलानी पराभूत झाले. तर मोदी लाटेत पुन्हा कलानी करिष्मा चालून राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर ज्योती कलानी आमदारपदी निवडून आल्या.भाजपचे वारे वाहत असल्याचा अंदाज घेवून ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत मुलगा ओमी व सून पंचम यांच्यासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली. भाजपने कामाला लागा, असे संकेत दिल्यावर कलानी कुटुंब प्रचाराला लागले.मात्र युतीच्या वाटाघाटीत उल्हासनगर शिवसेनेकडे जात असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्याने कलानी तसेच स्पर्धंक आयलानी गोटात शांतता पसरली. दोघांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी रोडावली होती. युती होणार की नाही असा प्रश्न दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना सतावू लागला आहे.शिवसेना शहरप्रमुख चौधरी मुख्य दावेदारभाजप-शिवसेना युतीच्या वाटाघाटीत मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी मुख्य दावेदार आहेत. त्यांनी तशी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे यांनी निवडणूक लढवून त्यांना २३ हजारापेक्षा जास्त मतदान झाले. पक्षाने उमेदवारी दिल्यास रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रीया चौधरी यांनी दिली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा