Vidhan Sabha 2019: उल्हासनगर मतदारसंघ युतीतील शिवसेनेकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:50 PM2019-09-24T22:50:23+5:302019-09-24T22:52:00+5:30

शिवसैनिकांत जल्लोष; आयलानी-कलानी गोटात मात्र पसरली शांतता

Maharashtra Vidhan Sabha 2019 Ulhasnagar constituency to Shiv Sena? | Vidhan Sabha 2019: उल्हासनगर मतदारसंघ युतीतील शिवसेनेकडे?

Vidhan Sabha 2019: उल्हासनगर मतदारसंघ युतीतील शिवसेनेकडे?

Next

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : भाजप-शिवसेना युतीच्या वाटाघाटीत उल्हासनगर मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चेने भाजपकडून उमेदवारीसाठी आमने-सामने उभे ठाकलेल्या आयलानी व कलानी गोटात शांतता पसरली आहे. शिवसैनिकांनी मात्र जल्लोष करून पुढील आमदार शिवसेनेचा असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उल्हासनगर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी आयलानी व कालानी आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यासाठी दोन्ही गटातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत जावून कलानी समर्थंकावर गुन्हे दाखल झाले. मात्र मंगळवारी दुपारी युतीच्या वाटाघाटीत मतदारसंघ भाजप ऐवजी शिवसेनेकडे जात असल्याच्या बातम्या प्रसारित होताच शिवसैनिकांनी जल्लोष केला.

शिवसेनेकडे मतदारसंघ आल्यास कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी द्या अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपकडून महापौर पंचम कलानी यांना थेट कामाला लागा, असा आदेश भाजप श्रेष्ठींनी दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. तर कुमार आयलानी यांना उमेदवारी मिळण्यासाठी भाजप निष्ठावंत गटाने थेट वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे.

भाजपचे उल्हासनगरवर वर्चस्व राहिले असून पप्पू कलानी यांच्या पूर्वी भाजपचे शितलदास हरचंदानी सलग तीन वेळा आमदारपदी निवडून आले. त्यानंतर पप्पू कलानी सलग चार वेळा निवडून आले. मात्र पाचव्यांदा भाजपच्या कुमार आयलानी यांच्याकडून पप्पू कलानी पराभूत झाले. तर मोदी लाटेत पुन्हा कलानी करिष्मा चालून राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर ज्योती कलानी आमदारपदी निवडून आल्या.
भाजपचे वारे वाहत असल्याचा अंदाज घेवून ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत मुलगा ओमी व सून पंचम यांच्यासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली. भाजपने कामाला लागा, असे संकेत दिल्यावर कलानी कुटुंब प्रचाराला लागले.

मात्र युतीच्या वाटाघाटीत उल्हासनगर शिवसेनेकडे जात असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्याने कलानी तसेच स्पर्धंक आयलानी गोटात शांतता पसरली. दोघांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी रोडावली होती. युती होणार की नाही असा प्रश्न दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना सतावू लागला आहे.

शिवसेना शहरप्रमुख चौधरी मुख्य दावेदार
भाजप-शिवसेना युतीच्या वाटाघाटीत मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी मुख्य दावेदार आहेत. त्यांनी तशी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे यांनी निवडणूक लढवून त्यांना २३ हजारापेक्षा जास्त मतदान झाले. पक्षाने उमेदवारी दिल्यास रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रीया चौधरी यांनी दिली आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Ulhasnagar constituency to Shiv Sena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.