शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : एकमेकांना जोखण्याची युतीमध्ये लागली स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 00:49 IST

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असला तरी भाजपची स्थानिक मंडळी मतदारसंघावर दावा करीत आहेत. अंबरनाथ मतदारसंघ आम्ही मागितला असल्याचे मीडियाला वरचेवर सांगण्यामागे शिवसेनेवरील दबाव वाढवणे हाच हेतू आहे. कदाचित संपूर्ण राज्यभर हेच दबावतंत्र भाजप राबवत असू शकते.

- पंकज पाटील

अंविधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र गेल्या विधानसभेत युती तुटल्याने शिवसेना आणि भाजप यांना स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत लढत जोरदार झाली. मात्र विजय हा शिवसेनेचाच झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती निश्चित मानली जात असल्याने ही जागा शिवसेनेलाच जाईल हे उघड आहे. मात्र भाजपचे स्थानिक पुढारी शिवसेनेच्या विरोधात जाऊन उमेदवारीचा दावा करीत आहेत. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचा आमदार असतांनाही उमेदवारीसाठी चर्चा मात्र भाजपची होतांना दिसत आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा शिवसेनेचे डॉ. बालाज किणीकर यांचा विजय झाला आहे. पक्ष त्यांनाच पुन्हा संधी देणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र असे असतांनाही भाजप अंबरनाथसाठी जोर लावत आहे. गेल्या निवडणुकीतील काँटे ेकी टक्करचा संदर्भ देत अंबरनाथवर दावा केला आहे. अर्थात भाजपचा हा दावा पक्ष श्रेष्ठीकडे कमी पत्रकारांकडे जास्त केला जात आहे.
पत्रकार परिषदेत आग ओकणारे स्थानिक पुढारी वैयक्तिक गप्पांमध्ये युतीचा धर्म पाळावाच लागेल अशी भूमिका मांडत आहेत. अंबरनाथ विधानसभेची कोअर कमिटी उमेदवारीचा आपला दावा अद्याप धरुन आहे. भाजपकडे भक्कम उमेदवार नसला तरी इच्छुकांची संख्या कमी नाही. त्यातच गेल्या वर्षभरापासून उमेदवारीसाठी काम करणारे सुमेध भवार यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे. जागा सुटली तर उमेदवारी त्यांना मिळेल असे निश्चित मानले जात आहे.
मात्र जागाच सुटली नाही तर भवार यांच्यावरही पक्षादेश बंधनकारक असेल. भाजपची मंडळी ज्या पद्धतीने केवळ मीडियाकडे दावे करीत आहे ते पाहता ठिकठिकाणी शिवसेनेवरील दबाव वाढवण्याची ही भाजपची खेळी असावी. जागावाटपात शिवसेनेनी नमते घ्यावे याकरिता भाजपने ही खेळी खेळली असावी.
उमेदवारीवरील दाव्याच्या नादात अंबरनाथची भाजप आपली ताकद शिवसेनेला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र शिवसेनेत सारे आलबेल नाही. त्यांच्यातील अंतर्गत नाराजीमुळे भाजपला ठोस उत्तर दिले जात नाही. वरिष्ठ पातळीवर शिवसेना आणि भाजप जमवून घेत असली तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात बोलतांना दिसतात.
शिवसेनेकरिता भाजपची वाढती ताकद हीच अडचणीचा मुद्दा ठरत आहे. परंतु भाजपला रोखण्यासाठी कोणतीच व्यूहरचना शिवसेनेकडे दिसत नाही. परिणामी भाजपचे स्थानिक नेते शिवसेनेला उघडपणे आव्हान देत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत युती झाली तरी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली दरी त्रासदायक ठरु शकते. सध्या विरोधक इतके दुर्बळ झाले आहेत की, राज्यातील सत्ताधारी पक्षातील सुंदोपसुंदीचा ते फायदा उठवू शकत नाहीत.
युतीचा धर्म पाळण्याची वेळ आल्यावर शिवसेना उमेदवाराकडून योग्य मान मिळावा यासाठी भाजपचे पदाधिकारी विरोधाची भूमिका घेऊन दबाव वाढवत आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसेना, भाजपमध्ये एकमेकांची ताकद जोखण्याची चुरस सुरु असल्याने अंबरनाथ हेही त्यास अपवाद नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ambernath-acअंबरनाथ