शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: भाजप आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:43 IST

सेनेचा मतदारसंघ; भाजपची मोर्चेबांधणी

अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना अंबरनाथमध्ये सहा महिन्यानंतर येणाऱ्या पालिका निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. विधानसभेच्या तोंडावर भाजपकडून अनेक पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश देण्याचे काम सुरु आहे. काँग्रेसच्यावतीने देखील काही पदाधिकाºयांसह स्वाभिमानी सघटनेच्या पदाधिकाºयांचा प्रवेश करण्यात आला आहे. या पक्षप्रवेशाच्या स्पर्धेमुळे विधानसभेची निवडणूक रंगतदार झाली आहे.विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यातच अंबरनाथ पालिकेची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई येथे भाजपच्या वतीने अंबरनाथच्या काही पदाधिकाºयांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. भाजपचे स्थानिक नेते गुलाबराव करंजुले यांच्या नेतृत्वाखाली माजी अपक्ष नगरसेवक मुक्कू लेनीन, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा निलीमा नायडू, शिवसेना नगरसेवकाचे वडील राजा महाडीक, रिंकू गारुंगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, काँग्रेसनेदेखील पक्ष संघटना बळकट करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे राहुल सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर यांचा पक्ष प्रवेश करत त्यांच्यावर शहराची जबाबदारी सोपवली आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी, स्पर्धा मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये लागली आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेला समांतर ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.शिवसेनेचे काही नगरसेवक फोडण्याचाही प्रयत्नही भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपच्या या रणनितीला अद्याप शिवसेनेने प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र काँग्रेस आपल्या परिने ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेची ताकद सर्वाधिक असली तरी, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न आपआपल्या परिने करत आहे. निवडणुकीची रंगत जसजशी वाढेल, तसतशी ही स्पर्धा वाढणार आहे. त्यादृष्टीने सर्वच महत्त्वाचे पक्ष जास्तीत जास्त मासे आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस