शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: ठाणे मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:18 IST

काँग्रेस नडली; राष्ट्रवादी अडली

ठाणे : एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होण्याआधीच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली आहे. परंतु, असे असतानाही ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावरून कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसने या जागेवर दावा करून ती जागा मिळावी म्हणून श्रेष्ठींना साकडे घातले आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत मीरा-भाईंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरण ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे विधानसभा क्षेत्र सोडणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पदरात पडणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले, तरी यानिमित्ताने या दोन्ही पक्षांत तूर्तास ठिणगी पडली आहे.राज्यात आघाडीकडून वेगवान घडामोडी घडत आहेत. मात्र, ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एका मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा पडला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एक समझोता झाला होता. त्यानुसार, मीरा-भार्इंदर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्धार केला होता. त्या बदल्यात ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात राष्टÑवादी लढणार हे निश्चित झाले होते.आता ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर दावा केला आहे. पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता, त्यामुळे तो मिळावा यासाठी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, श्रेष्ठींकडेही त्यांनी तशी मागणी केली आहे.मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केला, तर या मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्टÑवादी हे वेगळे लढले होते. त्यानुसार, काँग्रेसला या मतदारसंघातून १५ हजारांच्या आसपास तर राष्टÑवादीला २४ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. तर, राष्टÑवादीचे येथे चार नगरसेवक निवडून आले. यामुळेच आता राष्टÑवादीने आपला दावा आणखी मजबूत केला आहे.ठाणे शहर मतदारसंघ मिळावा, ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, लोकसभेत ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहर विधानसभा सोडणार नाही.- आनंद परांजपे, ठाणे शहराध्यक्ष, राष्टÑवादीहा मतदारसंघ राष्टÑवादीला हवा असल्याची मध्यंतरी चर्चा होती. त्या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली असावी. मात्र, या मतदारसंघाबाबत अद्यापही दोन्ही पक्षांकडून कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच हा मतदारसंघ कोणाला मिळणार, हे निश्चित होणार आहे.- मनोज शिंदे,ठाणे शहराध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस