शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maharashtra Election 2019 : एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तिरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 01:40 IST

शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरला.

ठाणे : कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांचा मुहूर्त साधून शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसच्या यादीमध्ये नाव जाहीर होऊनही हिरालाल भोईर यांनी याठिकाणी माघार घेतल्याने आयत्यावेळी सकाळी १० वाजता काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या संजय घाडीगावकर यांनी तर मनसेतर्फे महेश कदम यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेना, मनसे आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे.शिंदे यांनी यावेळी चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळीही आपण गेल्या वेळी पेक्षाही जास्त मताधिक्यांनी निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत वडील संभाजी, पत्नी लता आणि मुलगा खासदार डॉ. श्रीकांत तसेच ठाण्याचे खासदार राजन विचारे, ठाणे शहर भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे तसेच शिवसेना भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.दुसरीकडे काँग्रेसच्या यादीमध्ये हिरालाल भोईर यांचे गुरुवारी रात्री नाव जाहीर होऊनदेखील त्यांनी आईच्या प्रकृतीच्या कारणामुळे माघार घेतली. तर भाजपातून काही दिवसांपूर्वी बाहेर पडलेले माजी नगरसेवक घाडीगावकर यांनी शुक्रवारी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.कदम यांचा अर्ज दाखलमनसेचे महेश कदम यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव अर्ज भरू शकले नाही. शुक्रवारी त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरला. ते ठाणे शहरमधून इच्छुक होते. मात्र, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना या मतदारसंघातून तिकीट मिळाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Eknath Shindeएकनाथ शिंदेkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडी