शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

Maharashtra Election 2019: शिवसेना खासदाराची सिटी बँक बुडाली; आता खातेदारांनी काय करावं?- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 20:56 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी युती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबईः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी युती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे खासदार सिटी को. ऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत आणि बँक बुडल्यावर खातेदार भगिनी त्या शिवसेनेच्या खासदारांना भेटायला गेले तर ते म्हणाले, मी काही करू शकत नाही, मरायचं तर मरा, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. ते भिवंडीतल्या मनसेच्या सभेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, आज पीएमसी आणि सिटी को. ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार आले होते, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत, आज बँका बुडत आहेत, उद्योग बुडत आहेत, तरीही आपल्याला राग येत नाही, व्यवस्थेला जबाबदार धरावेसे वाटत नाही. भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय बंद पडतोय, देशात पण अनेक उद्योगधंदे पडत आहेत आणि आपण काहीच वाटून घेत नाही आहोत, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. भिवंडीमधील विजेचा प्रश्न, टोरेंट नावाची कंपनी गुजरातमधून आली आणि तिने लुटायला सुरुवात केली. भिवंडीकरांनी भाषणांना टाळ्या द्यायच्या ऐवजी ती एक टाळी टोरेंटच्या अधिकाऱ्याच्या गालावर मारली तर परिस्थिती सुधारेल, असंही त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आज महाराष्ट्रात नाशिक वगळता सर्वत्र खड्डे आहेत. नाशिकमध्ये आपल्या सत्तेच्या काळात आम्ही टक्केवारी बंद केली आणि त्यामुळे रस्त्यांवर खड्डे नाही पडले. तेच कंत्राटदार होते जे आधीपण होते, पण कंत्राटदारांनी नाशिकमध्ये आमच्या काळात रस्ते चांगले बांधले कारण आम्ही टक्केवारी बंद केली. जर तीच तीच माणसं सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती कधी वाटणार की, आपण काम नाही केलं तर लोकं आपल्याला निवडून नाही देणार. जे आधी विरोधी पक्षात होते तेच आता सत्ताधारी गोटात जाऊन बसले आहेत, जो पर्यंत हे दलबदलू हरणार नाहीत तो पर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, असंही राज ठाकरेंनी म्हणत जनतेला परिवर्तनाचं आवाहन केलं आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019