शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद यांच्यात मुंब्रा-कळवा मतदारसंघात रंगणार सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 03:04 IST

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून अखेर शिवसेनेने मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिल्यामुळे आता येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.

ठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघातून अखेर शिवसेनेने मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिल्यामुळे आता येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. दीपाली या माहेरवाशीण म्हणून आल्या असून त्यांचे पुढील १५ दिवस लाड पुरवून त्यांच्याविरुद्ध दीड लाखाचे मताधिक्य घेऊन त्यांना सासरी पाठवले जाईल, असे टोणपे राष्टÑवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी लगावले आहेत.मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक होते. मात्र, या सर्वांच्याच इच्छेवर अखेर श्रेष्ठींनी पाणी फिरवून गुरुवारी रात्री दीपाली सय्यद यांना शिवसेनेत प्रवेश देऊन दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्जदेखील भरला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनेदेखील अनिल भगत यांना संधी दिली आहे. तर, एमआयएमने बरक्तुला एली हसन शेख यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, ते किती मते खाणार, यावर शिवसेनेचे भवितव्य निश्चित होणार आहे.शिवसेनेकडून राजेंद्र साप्ते, सुधीर भगत, प्रदीप जंगम आदींसह इतर दोन नावे चर्चेत होती. परंतु, त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीणचे उमेदवार असलेले सुभाष भोईर यांनी या मतदारसंघातून लढावे, अशी पक्षाची इच्छा होती. मात्र, त्यांनीदेखील येथून लढण्यास नकार दिला. त्यामुळे अवघ्या एका रात्रीत मुंबईतून आयात करून शिवसेनेने दीपाली यांना उमेदवारी दिली. त्यांची तशी मराठी सिनेमांमध्ये फारशी छाप दिसलेली नसली, तरी निवडणुकीत त्या किती छाप सोडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.आव्हाडांनी उडवली खिल्ली, तर दीपालीने केली टीकादुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र दीपाली यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. मतदानाच्या निकालाच्या दिवशी घराघरांमध्ये एकच गाणे वाजणार आहे, बाबूल की दुवाई लेती जा, जा तुजको सुखी संसार मिले, मयके की तुझे ना याद आहे, सध्या त्या माहेरवाशीण आहेत. त्यांचे १५ दिवस लाड करून परत घरी पाठवायचे आहे, असा टोला त्यांनी गाणे म्हणत लगावला आहे. तर, मुंब्रा भागात विकास झाला नाही, असा आरोप दीपाली यांनी केला आहे. त्यावर, त्या ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी विकासच करतात, असा पलटवार आव्हाडांनी केला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019mumbra-kalwa-acमुंब्रा कलवा