शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

परवानगी द्या महाराजांचा पुतळा बांधून दाखवतो; जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांना आव्हान

By अजित मांडके | Updated: November 6, 2024 15:16 IST

देवेंद्र फडणवीस कधी मुंब्र्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना मुंब्र्याची रचना माहीत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला तर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मुंब्र्यात पुतळा बांधून दाखवतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहेत.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे:  देवेंद्र फडणवीस कधी मुंब्र्यात आले नाहीत त्यामुळे त्यांना मुंब्र्याची रचना माहीत नाही, मुंब्र्याच्या वेशीवर असलेल्या शिल्पात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली, निधी दिला तर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मुंब्र्यात पुतळा बांधून दाखवतो असे थेट आव्हान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराजांचा पुतळा उभारल्यावर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे लोकपर्ण करून दाखवतो असेही ते म्हणाले. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान केले होते की मुंब्र्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारून दाखवा त्याला आता आव्हाड यांनी प्रतिउत्तर देत आव्हान दिले. का एखाद्या शहराला का एका धर्माला बदनाम करता असा सवालही त्यांनी केला.  मी त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करतो जिथे ५० टक्के मुस्लिम आहे ५० टक्के हिंदू आहेत असेही ते म्हणाले.  संविधान बाबत त्यांना छेडले असता जे राहुल गांधी यांनी संविधान दाखवले होते त्याचा रंग लाल का आहे याचा अर्थ त्यांनी यावेळी समजून सांगितला. लाल रंगाचा अर्थ प्रेम , हृदय , क्रांतीचा रंग लाल आहे असे ते म्हणाले. आमचं रक्त सळसळत आहे कारण तुम्ही संविधान बदलणार म्हणून या संविधानाचा रंग लाल आहे असं त्यांनी स्पष्ट केले. हृदयाचा रंग लाल आहे त्याचा काय नक्षलवाद्यांशी सम्बध आहे का, लहान पोरं सारखे खेळ वाटतात , उगाच मुब्र्याला बदनाम करु नका,  स्टेशन च्या बाजूला सुंदर मंदिर बांधून दिले, राज ठाकरे म्हणाले जा मदर्स्या मधे मशीन गण मिळतील तुम्हाला हिंदूंना मुसलमानच नावाने भडकावयाचे आहे असेही ते म्हणाले. 

चौकशी लावा मुंब्र्यात आणि प्रुव करून दाखवा तिथे बांगलादेशी आणि पाकिस्तानी राहतात, मुंब्र्यात टार्गेट करून साधायचं काय आहे असा सवाल त्यांनी राज याना केला, मी ठाण्यात अठ्ठावीस मंदिर बंधेलत पण मी कधी सांगत नाही बारामतीचा विकास शरद पवारांनी केला. अजित पवार यांनी जाहीर केलेल्या अहवालात बारामतीचा विकास आपण केला असा उल्लेख केला आहे यावर आव्हाड यांना छेडले असता  बारामती चा विकास शरद पवार यांनी केला असल्याचे त्यानी स्पष्ट केले. अजित दादांचे योगदान नाकारत नाही, मात्र शरद पवार मायनस म्हणजे बारामती काहीही उरत नाही असेही ते म्हणाले. निवडणूकीतून शरद पवार माघार घेतील पण राजकारणातून त्यांना माघार घेता येणार नाही, शरीरामुळे ते आता बोलत असतील असेही ते म्हणाले. राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय आम्हाला विचारल्या शिवाय घेणार नाही.

लाडकी बहिण कोणाची आहे अजित दादांची आहे , मुख्यमंत्र्यांची आहे की देवा भाऊंची आहे की प्रत्येकाची एक एक आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली. इथे पोलिसांचा पगार झाला नाही, पुढच्या महिन्यात शासकीय नोकरांच्या पगार होईल की नाही ते सांगता येत नाही केवळ घोषणांचा पाऊस पडायला काय लागत असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस