शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
4
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
5
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
6
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
7
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
8
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
9
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
10
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
11
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
12
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
13
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
15
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
16
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
17
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
18
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
19
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
20
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता

By अजित मांडके | Updated: October 24, 2024 05:55 IST

मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघेंना उमेदवारी

अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील चार मतदारसंघांत यावेळी कांटे की टक्कर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीतून उद्धवसेनेचे केदार दिघे रिंगणात उतरणार आहेत. ठाणे शहरात भाजप, मनसे आणि उद्धवसेना यांच्यात रंगतदार लढत अटळ आहे. ओवळा माजिवडात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशी थेट लढत पहावयास मिळेल.

ठाणे शहरात तिरंगी लढत

ठाणे शहरमधून भाजपने तिसऱ्यांदा संजय केळकर यांना संधी दिली आहे. मनसेचे अविनाश जाधव हे दुसऱ्यांदा त्यांच्या समोर उभे ठाकले आहेत. उद्धव सेनेकडून माजी खा. राजन विचारे मैदानात आहेत. शिंदेसेनेकडून माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

मुंब्रा-कळवा : मित्र झाला विरोधी

मुंब्रा-कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. गेल्या निवडणुकीत आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा पराभव केला होता. यावेळी आव्हाड विरुद्ध त्यांचे निकटवर्तीय यांच्यात लढत आहे. मनसेने सुशांत सुर्वेराव यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे सेनेतील नाराज राजन किणे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.

कोपरी-पाचपाखाडी

कोपरी-पाचपाखाडी हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. मागील वेळेस शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत झाली होती. परंतु, शिंदे यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. आता शिंदे यांच्या समोर उद्धव सेनेकडून 'दिघे कार्ड' चालवले जात आहे. येथून स्व. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उद्धव सेनेने मैदानात उतरवले आहे.

ओवळा-माजिवडा

या मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धव सेना असा सामना रंगणार आहे. प्रताप सरनाईक हे तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेकडून नरेश मणेरा यांचे नाव अंतिम झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप पाचंगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडीmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाthane-acठाणे शहरovala-majiwada-acओवळा-माजिवडाEknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४