शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मविआतील पक्षांचा प्रचार करायचा की नाही?, काँग्रेसचे पदाधिकारी करणार आज फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 09:19 IST

Maharashtra Assembly Election 2024 : पक्षाच्या वतीने बी.एल.ए. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात ठाणे लोकसभेचे निरीक्षक संवाद साधणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.  

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला नाममात्र जागा आल्या असून, ठाण्यातील चारपैकी एकही जागा आली नसल्याने निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार करायचा की नाही याचा फैसला आज, रविवारी ठाणे शहर काँग्रेस घेणार आहे. पक्षाच्या वतीने बी.एल.ए. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात ठाणे लोकसभेचे निरीक्षक संवाद साधणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.  

काँग्रेसच्या वतीने रविवारी सकाळी ११ वाजता एन.के.टी. हॉल येथे एक दिवसाचा निर्धार मेळावा आणि बी.एल.ए. प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात ७०० कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. या शिबिराला ठाणे लोकसभेचे निरीक्षक तथा केरळचे आमदार सजीव जोसेफ हे मार्गदर्शन करणार आहेत. 

नाराजी दूर करणार की...?विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मेळावा घेतला जाणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबरच वरिष्ठ नेते संवाद साधणार असल्याची माहिती शहर काँग्रेसमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. चार विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसला संधी न दिल्याने असलेली नाराजी यावेळी व्यक्त होईल, असे समजते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024