शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 23:27 IST

आनंद दिघे यांचे खरे वारसदार केदार दिघे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात म्हटलं.

अजित मांडके

ठाणे : ठाणे हे गद्दारीचे केंद्र बिंदू आहे. या केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावली तर संपूर्ण महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल असे मत उद्धव सेनेचे उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे बेनरवर फोटो लावता. मर्दाची खरी अवलाद असाल तर स्वतःच्या वडिलांचे फोटो लावा आणि निवडणुका जिंकून दाखवा असे आव्हान देखील त्यांनी केले. काही पक्ष चिन्ह चोरून वारसदार झळव आहेत मात्र आनंद दिघे यांचे खरे वारसदार हा केदार दिघे असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाण्याला गद्दारीचा कलंक लागला आहे. हा कलंक आता पुसण्याची वेळ आली आहे.  ठाणे महापालिकेला यांनी भिकेला लावलं आहे. हे आणि यांचे बगलबच्चे आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी पालिकेची तिजोरी रिकामी केली आहे. मुंबई महापालिकेतील ९० हजार कोटींच्या ठेवी यांच्या कंत्राटदारांनी लुटल्या, ठाण्याच्या जागेवर तुम्ही जरा जोर लावला असता तर ठाण्यातून गद्दार निवडून आला नसता असेही ते म्हणाले.

तुम्हाला ठाण्याची मिसळ सोडून ढोकळा आवडायला लागला अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. गेल्या वेळी बिनशर्ट  पाठिंबा दिला होता यावेळी इनशर्ट पाठिंबा दिला आहे असा टोला त्यांनी मनसेवर लगावला. ती आता मनसे नाही तर गुनसे सेना असल्याची टीकाही त्यांनी केली.

तुमच्या मनात बाळासाहेब, दिघे असतील त्यांचे संस्कार तुम्हाला टिकवायचे असतील तर आता तुम्हाला हाती मशाल घेऊन पक्ष, चिन्ह चोरणाऱ्यांना आता धडा शिकवायचा आहे असेही ते म्हणाले. तसेच यावेळी सर्व मर्द निवडून द्यावे लागतील असेही उद्धव ठाकरे  म्हणाले. स्टेजचा काही भाग अचानक खाली गेला 

सभा संपून राष्ट्रगीत झाल्यानंतर स्टेजवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी झाली. त्याच वेळी त्या स्टेजचा काही भाग अचानक खाली गेला. त्यावेळी स्टेज उध्दव ठाकरे उपस्थित होते. सुदैवाने उध्दव ठाकरे यांच्यासह इतर कोणालाही दुखापत झाली. या घटनेने खळबळ उडाली. तर काही मिनिटात उध्दव ठाकरे स्टेज वरून खाली उतरले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे