शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत बंडोबा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 13:44 IST

Maharashtra Assembly Election 2024 : आता येत्या ४ नोव्हेंबरपूर्वी बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे. ४ नोव्हेंबरनंतर नेमक्या किती मतदारसंघांत किती बंडखोर राहतात, हे स्पष्ट होईल.

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत महायुती अथवा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध त्याच पक्षाच्या किंवा मित्रपक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. ठाणे शहर, ओवळा-माजिवडा, मुंब्रा-कळवा, डोंबिवली व शहापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत ठळक बंडखोरी दिसत नाही.

महायुतीमहाविकास आघाडीमधील प्रत्येकी तीन पक्षांतील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने व पक्षांमध्ये समन्वय नसल्याने घाऊक बंड झाले आहे. आता येत्या ४ नोव्हेंबरपूर्वी बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे. ४ नोव्हेंबरनंतर नेमक्या किती मतदारसंघांत किती बंडखोर राहतात, हे स्पष्ट होईल.

पाचपाखाडीमध्ये... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीतून स्व.आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धवसेनेतर्फे रिंगणात उतरले आहेत. येथे काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मविआच्या मतविभाजनाचा शिंदे यांना फायदा होऊ शकतो. 

ऐरोली, बेलापुरात... ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक (भाजप) विरुद्ध उद्धवसेनेचे एम.के. मढवी अशी लढत असताना शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांनी रिंगणात उडी मारली आहे. बेलापूरमध्ये गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश करून भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंड केले. शिंदेसेनेचे विजय नहाटा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. 

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला भीती?मीरा-भाईंदरमध्ये गेल्या वेळी अपक्ष निवडणूक लढवून विजयी झालेल्या गीता जैन यांनी आणि भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपने ऐनवेळी गीता जैन यांना डावलून मेहता यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे जैन यावेळीही पुन्हा अपक्ष रिंगणात आहेत. याखेरीज भाजपमधील सुरेश खंडेलवाल (अपक्ष), अजित पवार गटाचे अरुण कदम (अपक्ष) यांनीही बंडाचे निशाण फडकवले आहे.

कल्याण ग्रामीणचा तिढाकल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजयी झाले होते. मनसेने लोकसभेत दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्याकरिता पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल न करण्याकरिता भाजपचा दबाव असतानाही शिंदेसेनेचे राजेश मोरे यांनी रिंगणात उडी घेतली आहे. कदाचित मुंबईतील माहीम व कल्याण ग्रामीणचा तिढा एकाच वेळी सुटेल. 

कल्याण पूर्व आणि पश्चिम कल्याण पूर्वेत भाजपने सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत उद्धवसेनेच्या धनंजय बोडारी यांच्याशी असतानाही शिंदेसेनेचे महेश गायकवाड (अपक्ष) यांनी, तर काँग्रेसच्या सचिन पोटे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल करून दोन्ही अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. कल्याण पश्चिममध्ये शिंदेसेनेच्या विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात नरेंद्र पवार व वरुण पाटील या भाजपच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे राकेश मुथा व राजाभाऊ पातकर यांनी बंडखोरी करून उद्धवसेनेचे सचिन बासरे यांची चिंता वाढविली आहे. 

उल्हासनगरात काय?उल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी व शरद पवार गटाचे ओमी कलानी, असा सामना असताना अजित पवार गटाचे भरत गंगोत्री यांनी रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन होण्याची भीती आहे.

अंबरनाथ, मुरबाडमध्ये चिंता कुणाला?अंबरनाथमध्ये सुमेध भवार या काँग्रेस पदाधिकाऱ्याने बंड केले आहे. मुरबाडमध्ये किसन कथोरे विरुद्ध सुभाष पवार या लढतीत शरद पवार गटाचेच शैलेश वडनेरे यांच्या बंडामुळे पक्षाची चिंता वाढली. 

भिवंडी पूर्व, पश्चिम वादातभिवंडी पूर्वेत सपाच्या रईस शेख यांच्या विरुद्ध उद्धवसेनेच्या रूपेश म्हात्रे यांनी शड्डू ठोकला, तर भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपच्या स्नेहा पाटील यांनी शिंदेसेनेचे शांताराम मोरे यांच्या विरोधात मैदानात उडी घेतली. भिवंडी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या दयानंद चोरघे यांच्या विरोधात काँग्रेसचे विलास पाटील यांनी बंड केले आहे. एमआयएमकडून तुरुंगात असलेले खालिद गुड्डू व वारीस पठाण यांचेही अर्ज आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी