शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

महामुंबई महामॅरेथॉन...पूर्वसंध्येलाच बीब एक्स्पोपासूनच ‘कर दे धमाल’ सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 08:04 IST

लोकमत महामुंबई महामॅरेथॉन रविवारी असून, त्या पार्श्वभूमीवर शनिवारी रेमंड ट्रेड एक्स्पो हॉल येथे बीब एक्स्पोचे आयोजन केले होते.

ठाणे : लोकमत महामुंबई महामॅरेथॉनच्या बीब एक्स्पोमध्ये रॉक बँडवर एकेका लोकप्रिय गाण्याची धून वाजू लागताच बीब्स घेण्याकरिता आलेल्या तरुणाईची पावले थिरकू लागली. अवघ्या काही क्षणात रेमंडच्या त्या सभागृहात शेकडो तरुण-तरुणींनी ठेका धरला व नृत्याच्या जोशपूर्ण उत्साहाने साऱ्या सभागृहात सळसळते वादळ निर्माण झाले. महामुंबई महामॅरेथॉनच्या पूर्वसंध्येलाच बीब एक्स्पोपासूनच ‘कर दे धमाल’ सुरू झाली. 

रोहन रावत आणि ग्रुपने सादर केलेल्या रॉक बँडने बीब एक्स्पोची रंगत उत्तरोत्तर वाढवली. लोकमत महामुंबई महामॅरेथॉन रविवारी असून, त्या पार्श्वभूमीवर शनिवारी रेमंड ट्रेड एक्स्पो हॉल येथे बीब एक्स्पोचे आयोजन केले होते. यावेळी धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी रॉक बँडने सादरीकरण केले. या रॉक बँडला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. इतकेच नव्हे तर सखी मंचच्या महिलाही फेर धरून नाचत होत्या. बाप-लेक, मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहीण असे सारेच थिरकत होते. 

‘छोगारा तारा’ या गाण्यावर सर्वच धावपटू गरबा खेळू लागले. त्यानंतर राबता, केसरीया, गल्यान साखली सोन्याची, यमला पगला दीवाना, ओम शांती ओम, ये दोस्ती हम नही तोडेंगे, झिंग झिंग झिंगाट, मै निकला गड्डी लेके, तेरी आँखो का ये काजल, जवानी फिर ना आए यांसारख्या अनेक बॉलिवूड, मराठी गाण्यांवर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. 

गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी लोकमत महामुंबई महामॅरेथाॅनचा उत्साह भरभरून आहे. प्रत्येक ठिकाणी मेडिकल, हायड्रेशन, रिफ्रेशमेंट अशा विविध सुविधांचे आयोजन नेटाने केले आहे. गेल्यावर्षीचा रिपोर्ट चांगला होता म्हणून यंदा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. - हरिदास नायर, मेंटॉर

‘लोकमत’ने बीब एक्स्पोचे अप्रतिम आयोजन केले आहे. गर्दीवर नियंत्रण देखील उत्तमरीत्या केले आहे. येथे आल्यावर एक प्रकारचा जिवंतपणा जाणवत आहे. प्रायोजकांनी चांगले सहकार्य केले आहे. - गिरीश बिंद्रा, मेंटॉर

मान्यवरांची उपस्थितीभाजप आमदार ॲड. निरंजन डावखरे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलिस अतिरिक्त आयुक्त संजय जाधव आणि महेश पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, क्रेडाई एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, नीरा अस्थाना, महानगर गॅस लि.चे कॉर्पोरेट कम्युनिकेशन जनरल मॅनेजर, टीप टॉप प्लाझाचे संचालक जयदीप शाह, युनियन बँकेचे ठाणे डेप्युटी रिजनल हेड राजकुमार सोनम, ब्लॉसम रेडी टू ईटचे व्यवस्थापकीय संचालक आनंद ठक्कर, कॅन्सर कंट्रोल मिशनचे संस्थापक पुष्पेंद्र राज, रौनक ॲडव्हर्टायझिंगचे प्रोप्रायटर अमरदीप सिंह, लायन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुहास देसाई, टोटल स्पोर्ट्सचे मार्केटिंग हेड रवींद्र साळुंखे, फार्च्युन राईस ब्रॅन हेल्थ ऑईलचे झोनल ट्रेड मार्केटिंग मॅनेजर श्रीकांत पाटणकर, कीक इव्हीचे संस्थापक सागर जोशी.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन