शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महामुंबई महामॅरेथॉनः सुदृढ आरोग्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 11:38 IST

Mahamumbai Mahamarathon: महामॅरेथॉन संकल्पना २०१६ मध्ये सुरुवातीला मांडली. तिचे लोकमत समूहाने स्वागत केले. तिचे आता मूर्त स्वरुप झाले आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संपूर्ण लोकमत परिवार, धावपटू, पार्टनर यांचा यात मोठा वाटा आहे.

ठाणे: महामॅरेथॉन संकल्पना २०१६ मध्ये सुरुवातीला मांडली. तिचे लोकमत समूहाने स्वागत केले. तिचे आता मूर्त स्वरुप झाले आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संपूर्ण लोकमत परिवार, धावपटू, पार्टनर यांचा यात मोठा वाटा आहे. महामॅरेथॉन हे एक सेलिब्रेशन आहे. चांगल्या आरोग्यासाठी धावणे हा सर्वोत्तम व्यायाम असून ठाण्यातील महामॅरेथॉनच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन लोकमतच्या संचालिका रुचिरा दर्डा यांनी व्यक्त केले.

शहरातील आयर्नमॅन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या क्रीडापटूंनी लोकमतच्या महामॅरेथॉनच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. तसेच यंदा डिसेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेतही मोठ्या संख्येने धावपटूंनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी बुधवारी मुंबईकरांना केले. निमित्त होते क्रीडाई एमसीएचआय ठाणे प्रस्तुत तसेच महानगर गॅस पॉवर्डबाय महामुंबई महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाच्या इन्फ्ल्युएन्सर मीट निमित्त आयोजित कार्यक्रमाचे. याप्रसंगी कर्नल क्रीपाल सिंग, त्यांच्या पत्नी श्रृती सिंग, एमसीएचआयचे ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, भुवन रानडे (मार्केटिंग मॅनेजर टोटल स्पोर्ट्स), टीप टॉप प्लाझाच्या स्मिता शाह, किक ईवीचे फाउंडर सागर जोशी, किक ईवीचे तुषार खैर, कैंसर कंट्रोल मिशनचे फाउंडर पुष्पेंद्र राज, टेक क्लिनिक कनेक्ट चे फाउंडर आणि सीईओ दीपक पाटील, साई ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे एमडी डॉ. खालिद शेख, आयकॉन अॅडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचे चेअरमन कमलेश शर्मा, ठाणे डिस्ट्रिक्ट अॅथलिट असोसिएशनचे अशोक आहेर, लोकमतचे उपाध्यक्ष डॉ. विजय शुक्ला, महामॅरेथॉनचे रेस डायरेक्टर संजय पाटील या मान्यवरांच्या हस्ते टी शर्टचे अनावरण करण्यात आले. अतिशय आकर्षक रंग संगतीचे हे टीशर्टस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दिले जाणार आहेत.

यावेळी विविध आयर्नमॅन आणि क्रीडापटूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी, लोकमतचे उपाध्यक्ष डॉ. विजय शुक्ला यांनी 3 डिसेंबर रोजी होणारी ही स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करीत मान्यवरांचे स्वागत केले. लोकमतच्या या महामॅरेथॉनसाठीच्या गुडीबॅगचे आणि मेडलचेही अनावरण याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपला सहभाग लवकर निश्चित करावा, असे आवाहन यावेळी लोकमतच्यावतीने संचालिका रुचिरा दर्डा यांनी केले.

यांचा झाला सन्मान ले. कमांडर बिजय नायर, नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, हरिदासन नायर, गिरीश बिंद्रा, गुरुमुर्थी नायक, पूजा वर्मा, पारितोष मोहिते, इंदू टंडन, मुनीर कुलापूर, प्रितम सिंग, गितांजली लेंका, सुकांतो रॉय, रिचा समीत, जेसूदास पिल्लई, विवेक सोनी, मिर्नल सेन, नरेश वाला, राजू मेश्राम, लीलकनवर चौहान, विजया खाडे, रोहित रावतोले, संजीत चक्रबोर्ती, अनिल पांचाळ, सार्थक वाणी आणि कल्याण डोंबिवली रनर्सचे धावपटू.

''सर्वप्रथम मी लोकमत महामुंबई महामॅरेथॉनला शुभेच्छा देत आहे आणि सर्व धावपटू ठाण्यात होणाऱ्या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी मी आशा व्यक्त करतो. या मॅरेथॉनचे असलेले उत्कृष्ट दर्जाचे नियोजन या मॅरेथॉनची जमेची बाजू आहे. ही मॅरेथॉन लवकरच देशातील सर्वोत्तम मॅरेथॉनच्या यादीमध्ये समाविष्ट होईल याची मला खात्री आहे आणि म्हणूनच एमसीएचआय ठाणे या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे. - जितेंद्र मेहता, अध्यक्ष, एमसीएचआय ठाणे

महामॅरेथॉन म्हणजे बूस्टर - गेल्या वर्षी या स्पर्धेत सहभागी होण्याचे भाग्य मला मिळाले. ही महामॅरेथॉन म्हणजे बूस्टर आहे. त्यामुळे आता पुन्हा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३ डिसेंबरची वाट पाहत आहे. एनर्जी आणि आनंद मिळत असल्याने ग्रेटर महामॅरेथॉन ही कॅप्शनच योग्य राहील. - कर्नल क्रीपाल सिंग, मुंबई

टॅग्स :MarathonमॅरेथॉनMumbaiमुंबईthaneठाणेLokmatलोकमत