महालक्ष्मी यात्रा ११ एप्रिलपासून

By Admin | Updated: April 1, 2017 23:31 IST2017-04-01T23:31:33+5:302017-04-01T23:31:33+5:30

महालक्ष्मी यात्रा उत्सवाची ट्रस्टकडून जय्यत तयारी सुरू असून यात्राकाळात ६० सुरक्षा रक्षक तैनात केले असून मंदिर परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेर लावण्यात आले आहेत.

Mahalaxmi tour from 11th April | महालक्ष्मी यात्रा ११ एप्रिलपासून

महालक्ष्मी यात्रा ११ एप्रिलपासून

शशिकांत ठाकूर , कासा
महालक्ष्मी यात्रा उत्सवाची ट्रस्टकडून जय्यत तयारी सुरू असून यात्राकाळात ६० सुरक्षा रक्षक तैनात केले असून मंदिर परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेर लावण्यात आले आहेत.
भाविकांच्या दर्शनासाठी ३ कायमस्वरूपी लोखंडी रेलिंग शेड तर एक बांबूचा रेलिंग शेड उभारण्यात आला आहे. तसेच विकलांग वयस्क व आजारी भाविकांसाठी दर्शनासाठी विशेष सुविधा केली असून मंदिर परिसर, साफसफाई व पिण्याच्या पाण्याची सुविधा ट्रस्ट कडून केली असल्याचे ट्रस्टचे कार्यवाहक शशिकांत ठाकूर यांनी सांगितले. तर यात्रे दरम्यान येणाऱ्या विविध अडचणी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी मांडल्या.
तालुक्यातील प्रसिध्द महालक्ष्मी देवीची यात्रा ११ एप्रिल पासून सुरू होत असून यात्रा नियोजनाबाबात डहाणू प्रांताधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची शनिवारी ट्रस्ट कार्यालयात सभा आयोजित केली होती.सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत पालघर जिल्हयासह, ठाणे, मुंबई, वापी, सुरत या ठिकाणाहून लाखो भाविक येत असल्याने तिच्या नियोजनासाठी आयोजिलेल्या या बैठकीला प्रांताधिकारी आँचल गोयल व तहसिलदार प्रीतीलता कोरेथी-माने उपस्थित होते.
यात्रेदरम्यान पोलीस प्रशासन चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असून त्यासाठी १२० पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केली असल्याचे कासा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुढे यांनी सांगितले. तसेच यात्रेदरम्यान घडणाऱ्या अनुचित प्रकारावर पोलीसांकडून विशेष लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारले जाणार आहेत. तसेच डहाणू आकाराकडून यात्रेसाठी भविकांना बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावेळी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, वीज महामंडळ आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात्रेसाठी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. या नंतर प्रांताधिकारी आंचल गोयल यात्रा उत्सवासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. व याबाबत ७ एप्रिल रोजी आढावा बैठक घेणार असलयाचे त्यांनी सांगितले. यावेळी डहाणू सभापती चंद्रिका आंबात, उपसभापती लतेश राऊत, कसा पोलीस ठाण्योच्या ंइधिकारी प्रियंका माने, तलासरी तहसिलदार विशाल दौंडकर, डहाणू गटविकास अधिकारी रमेश अवचार, तलासरी गट विकास अधिकारी राहूल धूम, ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख, उपाध्यक्ष नरेश सातवी, कोषाध्यक्ष वसंत सातवी, अनंता खुलात, आदी उपस्थित होते.

Web Title: Mahalaxmi tour from 11th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.