मदरशामध्ये विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:01 IST2018-10-17T00:00:51+5:302018-10-17T00:01:04+5:30
मुंब्रा : मदरशामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मुंब्रा येथे उघडकीस आली. येथील ...

मदरशामध्ये विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
मुंब्रा : मदरशामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मुंब्रा येथे उघडकीस आली.
येथील उदयनगर भागातील कश्यप अपार्टमेंटमध्ये एक मदरसा आहे. या मदरशामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षांच्या मुलाला मदरशामधील शिक्षक (मौलवी) शब्बीर शेख याने मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवला. नंतर त्याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. ते पिल्यानंतर विद्यार्थी बेशुद्ध झाला. त्यानंतर मौलवीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे.
ही घटना घडल्यापासून पीडित मुलगा मदरशामध्ये जाण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे त्याच्या आईला शंका आली. तिने मुलाला विचारणा केली असता, मुलाने हा धक्कादायक प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेखला अटक केली. त्याला न्यायालयाने १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.