शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

सदानंद दाते यांनी आयुक्तालयाच्या रोवलेला पाया उंचावण्याची मधुकर पांडेंवर जबाबदारी

By धीरज परब | Updated: December 14, 2022 17:44 IST

दाते यांची नियुक्ती झाली तेव्हा पोलीस आयुक्तालय म्हणून इमारत सुद्धा नव्हती.

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांनी जी पाया भरणी केली आहे तो पाया पुढे आणखी उंच व भक्कम करण्याची मोठी जबाबदारी नवनियुक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्यावर आली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यरत झाले आणि सप्टेंबर २०२० मध्ये पहिले पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांनी कार्यभार स्वीकारला होता .  अपुरे मनुष्यबळ , तुटपुंजी वाहने व यंत्रणा त्यातच ग्रामीण पोलीस खात्याची मानसिकता अश्या परिस्थितीत सरकारने व नागरिकांनी दातेंवर दाखवलेला विश्वास त्यांनी बऱ्याच प्रमाणात सार्थ ठरवला.

दाते यांची नियुक्ती झाली तेव्हा पोलीस आयुक्तालय म्हणून इमारत सुद्धा नव्हती. सुरवातीचे काही दिवस तर दाते यांनी दोन्ही शहरातील विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून कारभार पहिला . त्यानिमित्ताने त्यांना शहराची व शहरातील गुन्हेगारी तसेच उपस्थित पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांची सुद्धा कार्यपद्धती निदर्शनास आली . दातेंनी शासन कडे पाठपुरावा करून आयुक्तालयाची निधी , वाहने , यंत्रणा , पोलीस बळ तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान शक्य तेवढे उपलब्ध करून घेतले . पोलीस आयुक्तालयाची जागा ताब्यात घेतली. 

शहरातील गुन्हे रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यांची उकल होण्यासाठी एक सीसीटीव्ही कॅमेरा शहरासाठी मोहीम राबवत लोकसहभागातून शहर कॅमेऱ्याच्या नजरेखाली आणले. त्यातून खून , दरोडा पासून अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली. गुन्ह्यांचा तपास व आरोपीना शिक्षा होणे ह्यावर जातीने लक्ष दिले . तपासी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दरमहा पारितोषिक देऊन कौतुक केले. तर तक्रारी आलेल्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी आणि कार्यवाहीचा सुद्धा बडगा उगारला. त्याने आयुक्तलयाची कामगिरी उंचावली. कार्यालयीन वेळेत लोकांना थेट भेटण्यासह व्हॉट्स अप व भ्रमणध्वनी वरून सामान्य लोकांना सुद्धा प्रतिसाद मिळू लागल्याचा चांगला परिणाम झाला. 

विविध पोलीस सेल, नियंत्रण कक्ष आदी कार्यान्वित करतानाच गुन्हे दाखल न करून घेण्याची मानसिकता त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला . वाहतूक सुधारणा व शिस्त लावणे , कायदा सुव्यवस्था  राखणे ह्यावर देखील लक्ष दिले . मात्र काही उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बड्या राजकारणी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना मात्र दातेंनी पाठीशी घातले या बद्दल त्यांना टीकेला सामोरे जावे लागले . काही वादग्रस्त राजकारणी व त्यांच्या समर्थकांना वेगळा न्याय आणि सामान्यांना वेगळा न्याय असे प्रश्न यामुळे उपस्थित केले गेले. 

दाते यांची बदली दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून शासनाने केली असल्याने त्यांच्या जागी मधुकर पांडे यांची नवे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे . तसा पांडे यांना पूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असतानाचा परिसराचा अनुभव आहे . परंतु दाते यांच्या कार्यकाळात झालेल्या चांगल्या उपक्रमांना पुढे कायम ठेवण्याची जबाबदारी पांडे यांच्यावर आहे . गैरप्रकार रोखण्यासह तसे करणाऱ्या अधिकारी व पोलिसांना आणखी जरब बसेल अशी कार्यवाही पांडे यांच्या कडून अपेक्षित आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी सह वसई विरार व मीरा भाईंदर ह्या दोन्ही महापालिकांच्या  निवडणूका येणाऱ्या नव्या वर्षात होणार असल्याने राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचण्याचे  प्रभावी काम पांडे यांना करावे लागणार आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर