शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागात भाजपला ‘माधव’चा आधार; व्होट बँक फुटल्याने पुन्हा जुने समीकरण?

By मुरलीधर भवार | Updated: April 12, 2024 08:43 IST

व्होट बँक फुटल्याने पुन्हा जुने समीकरण?

मुरलीधर भवार

कल्याण : छगन भुजबळ, महादेव जानकर व पंकजा मुंडे या नेत्यांना रिंगणात उतरवून भाजपने वसंतराव भागवत यांच्या काळातील ‘माधव’ समीकरण पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात या तिन्ही समाजाची मते आहेत. ग्रामीण भागात माधव पॅटर्न जेवढा प्रभावी ठरतो, तेवढा तो कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरी भागात प्रभावी ठरत नसला, तरी भाजप पुन्हा आपली मूळ व्होट बँक राखण्याकरिता प्रयत्नशील असल्याचा संदेश देणे सुरु केले आहे.  

ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघ जनसंघाच्या काळापासून उजव्या विचारसरणीच्या उमेदवारांना अनुकूल राहिला आहे. भाजपने काँग्रेसच्या मराठा व्होट बँकेच्या राजकारणाला शह देण्याकरिता माधव पॅटर्न राबविला होता. माळी, धनगर आणि वंजारी समाजाची मते एकत्रित केली, तर प्रभावशाली ठरतात, हे भाजपने या पॅटर्नद्वारे दाखवून दिले. 

माळी समाजाची दोन्ही मतदारसंघांत ४० ते ५० हजार मते आहेत. भिवंडीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. कल्याण लोकसभेच्या बाबतीत माळी समाजाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही.- प्रशांत माळी, माळी समाजाचे प्रतिनिधी

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत धनगर समाजाची ७० हजार मते आहेत. वंजारी आणि माळी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा नसला, तरी धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा सुरू आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आरक्षणाविषयी काही हमी दिली जाते, त्यानुसार कोणाला मते द्यायची ही भूमिका जाहीर करणार आहे.- शिरीष लासुरे, धनगर समाजाचे प्रतिनिधी

 

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणेChhagan Bhujbalछगन भुजबळ