शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेअर्समध्ये गुंतवणुकीचे अमिष, वृद्धाची ४२ लाखांनी फसवणूक

By जितेंद्र कालेकर | Updated: February 29, 2024 21:15 IST

याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली.

ठाणे: फेसबुकद्वारे प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली बिसदेव छाबरा (रा. कोलशेत, ठाणे) या ७४ वर्षीय जेष्ठ नागरिकाची ४२ लाख १५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली.ठाण्यातील कोलशेत रोड परिसरात राहणारे छाबरा हे १४ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या घरी असतांना त्यांना एका भामटयाने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर संपर्क केला. शेअर ट्रेडिंग कसे करायचे? स्टॉक मार्केटमध्ये कोणते शेअर्स खरेदी केल्यास जास्तीत जास्त फायदा होईल, याची माहिती जाणून घ्यायची असल्यास व्हॉटसअॅप गृपमध्ये सहभागी व्हा, अशी पोस्टही टाकून एक लिंक पाठवली. छाबरा यांनाही शेअर ट्रेडिंगबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन ही लिंक स्वीकारली.धारण, १४ डिसेंबर २०२३ ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये याच भामटयाने फेसबुकवरुन दिलेल्या लिंकद्वारे त्यांना ‘इन्वेस्टर्स अलायन्स’ या व्हॉटसअ‍ॅप गृपमध्ये समाविष्ट केले. त्यानंतर गृप अ‍ॅडमिन डॉ. कुणाल सिंग याने त्यांना या व्हॉटसअ‍ॅप गृपद्वारे प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे व्हॉटसअ‍ॅप गृप असिस्टंट लिंडा मेहता, मेरा काना यांनी एका लिंकद्वारे त्यांना समाविष्ट करुन त्या लिंकच्या आधारे ‘स्कायरीम कॅपिटल’ अ‍ॅपमध्ये त्यांचे अकाऊंट आणि पासवर्ड तयार करण्यास भाग पाडले. त्यानंतर स्कायरिम कॅपिटल या गृपमधील मार्गदर्शक असलेल्याने छाबरा यांच्याकडून सुरुवातीला एक लाख पाच रुपये घेतले. त्यानंतर एकापाठोपाठ आॅनलाईन द्वारे त्यांनी काही रकमा घेऊन त्यांची ४२ लाख १५ हजार रुपये ऑनलाईन फसवणूक केली.

हे पैसे किंवा त्यापोटीचा नफा अशी कोणतीही रक्कम त्यांना या भामट्यांनी परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली कापूरबावडी पोलिस ठाण्यात या सायबर भामटयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसshare marketशेअर बाजार