बुधवार-गुरुवार ठाण्यात कमी दाबाने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:44 IST2021-08-12T04:44:50+5:302021-08-12T04:44:50+5:30

ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुराच्या पाण्यातील अडकलेला गाळ काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी ...

Low pressure water in Thane-Wednesday | बुधवार-गुरुवार ठाण्यात कमी दाबाने पाणी

बुधवार-गुरुवार ठाण्यात कमी दाबाने पाणी

ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुराच्या पाण्यातील अडकलेला गाळ काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याने कमी दाबाने पाणी येणार आहे.

अतिवृष्टीमुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला आहे. तो पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने या पंपाचा फ्लो कमी झालेला आहे. त्यामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून कमी होत आहे. वाहत आलेला गाळ काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. मात्र, या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फा. कं. प्रा.लि.कडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजीवाडा, मानपाडा, कोठारी कंपाउंड, पवारनगर, आझादनगर या भागात सुरू राहणार आहे, तसेच बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्र्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. दरम्यान, या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Low pressure water in Thane-Wednesday