एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा; उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 06:59 PM2021-10-12T18:59:48+5:302021-10-12T19:00:02+5:30

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो.

Low pressure water supply from MIDC; Water scarcity in Ain monsoon in Ulhasnagar | एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा; उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई

एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा; उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई

Next

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नागरिकांना पिण्याच्या पाणीसाठी वणवण भटकण्याची वेळ आली. एमआयडीसीची जलवाहिनी फुटून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याची कबुली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारेख यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. दरम्यान एमआयडीसीची जलवाहिनी सलग दोन दिवस फुटल्याने, शहरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारीख यांनी दिली. सुभाष टेकडी, संभाजी चौक, भरतनगर, ओ टी सेक्शन, कुर्ला कॅम्प, गायकवाड पाडा, दहाचाळ, ज्योती कॉलनी, शहाड गावठण, आनंदनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊन, महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली. गेल्या शुक्रवारी जलवाहिणीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसीने एक दिवस पाणी पुरवठा बंद केला. तर दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फुटली. तर त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. 

शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारीने पाणी पुरवठा विभागाची दाणादाण उडाली. अखेर सोमवारी सायंकाळ पासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने, अनेक भागात पाणी टंचाईची झळ बसली. पाणी पुरवठा विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांनी पाणी पुटवठा विभागाचा आढावा घेऊन, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याबाबत पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीला जाब विचारला. शहरात राबविण्यात आलेली अर्धवट पाणी पुरवठा वितरण योजना, पाणी गळती, कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा आदी कारणाने शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली. शहर पूर्वेतील अनेक भागात आजही दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

पाणी गळती थांबता थांबे ना?

शहरात ३५० कोटीच्या निधीतून पाणी वितरण योजना राबविली असूनही शहरात पाणी टंचाई कायम आहे. जलवाहिनी गळती होऊन लाखो लिटर पाणी गटारात जात असून महापालिकेने पाणी गळती थांबविली तर लाखो लिटर पाण्याची बचत होऊन नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

Web Title: Low pressure water supply from MIDC; Water scarcity in Ain monsoon in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.