मीरा रोडमध्ये लव्ह जिहाद? पोलीस निलंबित

By Admin | Updated: July 3, 2017 06:29 IST2017-07-03T06:29:03+5:302017-07-03T06:29:03+5:30

गुन्ह्यातून सोडवण्याचे आमिष दाखवणारा काशिमीरा पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल अन्वर बबन शेख (४९) याला निलंबित केले

Love jihad in Mira Road? Police suspended | मीरा रोडमध्ये लव्ह जिहाद? पोलीस निलंबित

मीरा रोडमध्ये लव्ह जिहाद? पोलीस निलंबित

मीरा रोड : गुन्ह्यातून सोडवण्याचे आमिष दाखवणारा काशिमीरा पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल अन्वर बबन शेख (४९) याला निलंबित केले. आपण अविवाहित असल्याचे खोटे सांगत त्याने आरोपी महिलेशी संबंध ठेवले. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याची चर्चा आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये एका २८ वर्षीय महिलेला काशिमीरा पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याचा तपास अन्वरकडे होता. तिला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी शेखने मदतीचे आश्वासन दिले. आपण अविवाहित असल्याचे खोटे सांगितले. या महिलेशी शेखने शारीरिक संबंध ठेवले. मात्र, ती गरोदर राहिल्यानंतर तिला दमदाटी करू लागला. गीताने पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता तिच्याशी निकाह केला.

Web Title: Love jihad in Mira Road? Police suspended