चाकूच्या धाकावर लॉटरी सेंटरचा गल्ला लुटला

By Admin | Updated: April 26, 2017 00:25 IST2017-04-26T00:25:15+5:302017-04-26T00:25:15+5:30

नौपाड्यातील एका आॅनलाईन लॉटरी सेंटरचा ४२ हजार रुपयांचा गल्ला दोन आरोपींनी सोमवारी रात्री चाकूच्या धाकावर लुटला.

The lottery center threw a knife on the knife | चाकूच्या धाकावर लॉटरी सेंटरचा गल्ला लुटला

चाकूच्या धाकावर लॉटरी सेंटरचा गल्ला लुटला

ठाणे : नौपाड्यातील एका आॅनलाईन लॉटरी सेंटरचा ४२ हजार रुपयांचा गल्ला दोन आरोपींनी सोमवारी रात्री चाकूच्या धाकावर लुटला.
तीनहातनाक्याजवळ सृष्टी आॅनलाईन लॉटरी सेंटर आहे. सोमवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास दोन इसम या दुकानात आले. त्यापैकी एकाने या दुकानाचे कर्मचारी कृष्णा जयस्वाल आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका ग्राहकास चाकूचा धाक दाखवला. तर दुसऱ्या आरोपीने जयस्वाल यांच्या खिशातून गल्ल्याची चावी काढून त्यातील ४२ हजारांची रोकड घेऊन दोन्ही आरोपींनी पलायन केले. जयस्वाल यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: The lottery center threw a knife on the knife