शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू श्री राम सर्वांचाच, मात्र भाजपाने राजकारणासाठी त्याचा वापर केला- रमेश चैन्नीथाल

By नितीन पंडित | Updated: January 24, 2024 15:20 IST

अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्री रामांपेक्षा जास्त महत्व मोदींना दिले गेल्याचाही केला आरोप

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: प्रभू श्री राम हे सर्वांचेच आहेत मात्र भाजप त्याचा राजकारणासाठी वापर करतो.देशात महागाई बेरोजगारी सारख्या अनेक समस्या असून युवकांसोबत सर्वसामान्य जनता त्रस्त असताना भाजपा फक्त मतांचे राजकारण करण्यात व्यस्त आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात तीन वेळा येऊन गेले,परंतु त्यांनी महाराष्ट्रासाठी भरीव असे काहीही केले नाही.श्रीराम सर्वांचे आहेत असून त्यांची पूजा आराधना देशातील कोट्यवधी जनता करीत आली आहे. अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्री रामांपेक्षा जास्त महत्व मोदींना दिला गेला हे सर्व राजकारणासाठी चालले आहे अशी टीका काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथाल यांनी भिवंडीत केली.

बुधवारी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यासाठी कोकण विभागीय काँग्रेस जिल्हा न्याय आढावा बैठकीचे आयोजन भिवंडी येथील वाटिका हॉटेल या ठिकाणी करण्यात आले होते.याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत चैन्नीथाल बोलत होते.या प्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,विरोधीपक्ष नेते विजय वड्डटीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,आरिफ नसीम खान,चंद्रकांत हांडोर,भालचंद्र मुणगेकर,हुसेन दलवाई यांसह आयोजक ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सर्व ताकदीने लोकसभा निवडणूक लढवणार असून महाराष्ट्रातील जागावाटप जानेवारी अखेरीस पूर्ण होणार आहे अशी माहिती देत सर्वच पक्षांना जागा मागण्याचा अधिकार आहे परंतु त्याबाबतचा अंतिम निर्णय इंडिया आघाडीच्या वरिष्ठ पक्ष नेत्यांकडून घेतला जाणार आहे.असेही यावेळी सांगण्यात आले.आसामचे मुख्यमंत्री चोर असून ते सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार चालवत आहेत.राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आसाम सरकारने त्यामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांच्या वर एफ आय आर दाखल केली आहे.केंद्र सरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी, सीबीआय,इन्कम टॅक्स यांचा वापर करीत असून त्यामुळे रोहित पवार यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने असल्याने त्याचा आम्ही निषेध करतो असे मत देखील यावेळी काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथाल यांनी व्यक्त करत राष्ट्रपती केवळ आदिवासी व महिला असल्यानेच त्यांना आयोध्या राम मंदिर सोहळ्याला निमंत्रित केले नाही अशी टीका देखील यावेळी करण्यात आली.

टॅग्स :congressकाँग्रेसbhiwandiभिवंडी