साडेसात लाखांची लूट
By Admin | Updated: November 15, 2016 04:40 IST2016-11-15T04:40:25+5:302016-11-15T04:40:25+5:30
बनावट चावीच्या आधारे कोपरी पूर्व भागातील सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी सोनेचांदीच्या दागिन्यांसह सात लाख ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुबाडला

साडेसात लाखांची लूट
ठाणे : बनावट चावीच्या आधारे कोपरी पूर्व भागातील सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी सोनेचांदीच्या दागिन्यांसह सात लाख ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुबाडला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरी कॉलनीतील सर्वोदय गृहनिर्माण सोसायटीतील धरमचंद जैन यांच्या ‘अपना ज्वेलर्स’मध्ये १२ नोव्हेंबरला रात्री चोरटे घुसले. जैन यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिलेले तीन लाखांचे विविध आकारांचे आणि वजनांचे दागिने, साडेचार लाखांचे चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि काही नाणी असा ऐवज लंपास केला. पो.नि.एम.डी. जाधव हे याप्रकरणी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)