शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

लोकमत महामुंबई महामॅरेथॉनमुळे ठाणेकरांमध्ये नवचैतन्य; धावपटूंचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 05:53 IST

महामॅरेथॉन...पहाटे ५ पासून ठाणे शहरातील रस्ते गजबजू लागले. बरोब्बर ६ च्या ठोक्याला २१ किमीची पहिली रेस सुरू झाली आणि उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

ठाणे - विठ्ठल कांबळे या तरुणाने त्याच्या डोक्यावर ‘लोकमत’ हे नाव रंगविले होते. तसेच शरीरावर रंगरंगोटी करून महामॅरेथॉनचा टीशर्ट परिधान केल्याचा फिल आणला. त्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक फोटोग्राफर सरसावले. कांबळे हे आयोजकांचा लोगो आपल्या शरीरावर रंगवितात. रंगरंगोटी करण्यासाठी त्यांना चार तास लागतात. त्यामुळे ते लक्षवेधी ठरतात. आतापर्यंत त्यांनी ३४७ स्पर्धांमध्ये अंगावर रंगवून भाग घेतला आहे.

संरक्षण दलाच्या धावपटूंनी दिली प्रेरणासेनादल, पोलीस, होमगार्ड आणि वनविभाग अशा संरक्षण दलाच्या विशेष 'डिफेन्स' गटातील धावपटूंनी महामुंबई महामॅरेथॉन स्पर्धेदरम्यान सर्वांना तंदुरुस्तीचा संदेश दिला. या गटाच्या पुरुष २१ किमी गटात १०९ टीए मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या दीपक कुंभार (मध्यभागी) यांनी बाजी मारली. पालघरच्या वनविभागात कार्यरत असलेल्या शैलेश गंगोडा (डावीकडे) यांनी दुसरे, तर नाशिक रोड कॅम्पच्या आर्टी सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या अविनाश पटेल यांनी तिसरे स्थान मिळवले. महिलांमध्ये, यामिनी ठाकरे (मध्यभागी) यांनी अव्वल स्थान पटकावले. प्रियांका पारिख (डावीकडे) आणि विनिता पाल यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. 

पुण्याहून आले सर्किट रनर पुण्यातील ६९ वर्षीय नरहरी कडेकर हे सर्किट रनर आहेत. ठाण्यातील महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता ते मुद्दाम पुण्याहून आले होते. त्यांनी आतापर्यंत १० किमीच्या महामॅरेथॉनमध्ये ३६ वेळा सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे आयोजन उत्तम करण्यात आल्याची प्रतिक्रिया कडेकर यांनी दिली. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

भावी पोलिसही धावलेशासनाने पाेलिस भरती जाहीर केल्यामुळे राज्यभरात युवक, युवती भरतीसाठीची तयारी करत आहेत. भरतीसाठीच्या परीक्षेमध्ये धावण्याच्या स्पर्धेलाही विशेष महत्त्व. यामुळे पोलिस भरतीची तयारी करणारे शेकडो मुलांनी स्पर्धेत सहभागी होऊन शारीरिक क्षमतांचा अंदाज घेतला. प्रशिक्षणार्थी पोलिसही उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाले होते. 

वनरूपीचे २५ कर्मचारी धावलेवनरूपी क्लिनिकने या स्पर्धेला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या क्लिनिकचे २५ कर्मचारी या स्पर्धेत धावले. त्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन चांगल्या आरोग्यासाठी धावणे किती गरजेचे आहे, हेच जणू दाखवून दिले. 

त्यांचे १०० स्पर्धक धावले ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे रुग्णांची गर्दी असलेले रुग्णालय असून, या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदींसह सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यांनी स्पर्धेत धावून आरोग्याचा संदेश दिला

अख्खे कुटुंब धावले नवी मुंबईतील वकील कृष्णा शिंदे यांच्यासह त्यांचे पती शंंकर शिंदे आणि मुलगा ओम शिंदे या तिघांनी १० किमीच्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला.  कोलशेत परिसरात राहणारे आनंद वर्मा, मुलगा यशराज आणि पत्नी प्रेरणा हे तिघेही धावले. पत्नी पाच किलोमीटर तर मुलगा तीन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत धावला. दिलीप सोनी आणि त्यांची पत्नी अंकिता यांच्यासह मुलगा आद्रेव यांनी स्पर्धेत भाग घेतला. 

मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी झेंडा दाखवून महामुंबई महामॅरेथॉनला ठाणे शहरात जोरदार शुभारंभ केला. झेंडा दाखवून धावपटूंचा उत्साह उंचावताना दिसले. यात आ. निरंजन डावखरे, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, प्रोकॅम मुंबई मॅरेथॉनचे संस्थापक अनिल सिंग, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, वनरुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले, श्रीमती घुले, ठाणे महापालिकेच्या उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे, ‘श्लोक’च्या संस्थापिका शीतल दर्डा, माजी नगरसेवक संजय वाघुले, ठाणे महापालिकेच्या उपकार्यालय अधीक्षक रीमा देवरुखकर, संगीत संयोजक महेश ओगले, ओम साई आरोग्य केअर प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. खालिद शेख, एनएसजीचे फर्स्ट इन कमांड कर्नल क्रिपाल सिंग, उद्योजक रमेश अग्रवाल, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, सखी मंचच्या संस्थापिका आशु दर्डा यांचा समावेश होता. 

‘लोकमत महामुंबई महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या धावपटूंंचे आभार. संपूर्ण महाराष्ट्रातून धावपटू या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. धावपटूंच्या मनोरंजनासाठी मनोरंजन कक्ष उपलब्ध केले होते. ‘भागो बिनधास्त’ याला साजेसे चित्र धावपटू बिनधास्त पळताना दिसले. पोलिस आणि ठाणे महापालिकेने या महामॅरेथॉनला खूप सहकार्य केले. महामॅरेथॉनला सहकार्य करणाऱ्या विविध संघटना, एजन्सी आणि प्रायोजकांचेही आभार - संजय पाटील, रेस संचालक

‘लोकमत महामुुंबई महामॅरेथॉन’ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे. जणू स्वप्न पाहत आहे, असे वाटत आहे. सर्व धावपटू व त्यांच्या पार्टनरचे खूप आभार मानते. या महामॅरेथॉनमधून खूप काही शिकायला मिळाले. नवनवीन गोष्टी घडतात आणि आपण शिकत जातो. ही महामॅरेथॉन यशस्वी करण्याचा १०० टक्के प्रयत्न ‘लोकमत’ने केला - रुचिरा दर्डा, महामॅरेथॉनच्या संचालिका

 

टॅग्स :Lokmatलोकमत