शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आधी 'हम आपके है कौन', पण आता पाटील-कथोरे म्हणतात ‘हम साथ साथ है’!

By पंकज पाटील | Updated: March 19, 2024 09:33 IST

गेले काही महिने किसन कथोरे आणि कपिल पाटील परस्परांमधील वादांमुळे आले होते चर्चेत

पंकज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : गेले काही महिने परस्परांमधील वादांमुळे चर्चेत आलेले आमदार किसन कथोरे यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली. निवडणुकांच्या पूर्वी ‘हम आपके है कौन’ अशी भूमिका घेणारे पाटील-कथोरे आता निवडणुका लागल्यानंतर ‘हम साथ साथ है’ची ग्वाही देत असल्याने भाजपची चिंता कमी झाली. 

गेल्या दीड वर्षांपासून आ. कथोरे आणि राज्यमंत्री पाटील यांच्यातील राजकीय वाद सर्वांच्या चर्चेचा विषय होता. या दोन बड्या लोकप्रतिनिधींत समेट घडवण्याचा प्रयत्न खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. मात्र तो अवघा दीड महिनाच टिकला. मुरबाड मतदारसंघात निवडणुकीदरम्यान राजकीय खेळी करताना पाटील आणि कथोरे यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपर्यंत हे दोन्ही नेते एकमेकांना पाण्यात बघत होते. मात्र लोकसभा निवडणुका लागल्यानंतर पक्षाची जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याने आता या दोन लोकप्रतिनिधींमध्ये समेट झाला. पाटील यांनी कथोरे यांचे निवासस्थान गाठून राजकीय विषयांवर चर्चा केली. दोन बडे लोकप्रतिनिधी एकत्रित आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र हा राजकीय समेट केवळ निवडणुकीपुरता आहे, की कायमचा याची चर्चा रंगू लागली आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड आणि शहापूर विधानसभा क्षेत्रात आ. कथोरे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कथोरेंची नाराजी पाटील यांना त्रासदायक होऊ नये यासाठीच हा समेट झाला आहे. भाजपतील शिस्त लक्षात घेऊन आ. कथोरे यांना कोणतेही चुकीचे पाऊल उचलता येणार नाही. इच्छा असो वा नसो मात्र भाजपचा उमेदवार म्हणून कथोरे यांना कपिल पाटील यांचा प्रचार करावाच लागणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलMLAआमदारbhiwandiभिवंडी