शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Lok Sabha Election 2019: भिवंडी मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये लॉबिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:57 AM

लोकसभा निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

भिवंडी : लोकसभा निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्वपक्षाकडून तिकीट मिळण्याची शाश्वती नसलेल्या उमेदवारांनी इतर पक्षांकडे तिकिटासाठी चाचपणी सुरू केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यासमोर तोडीचा उमेदवार देण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु असून, त्यादृष्टीने सक्षम आणि लोकप्रिय उमेदवाराचा पक्षाकडून शोध सुरु आहे; मात्र मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील काँग्रेस उमेदवार आयात करते की काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत आहे.माजी खासदार, तथा काँग्रेसचे ठाणे ग्रामिण जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी उमेदवारीसाठी दिल्लीत ठाण मांडले आहे. काही भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील काँग्रेस नेत्यांशी थेट संपर्क साधून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे शहर व ग्रामिण भागातील पक्ष कार्यकर्त्यांचे काँग्रेसच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कपील पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मोहीम सुरू केली असून ते खुलेआम आपली मते प्रदर्शीत करू लागली आहेत. त्यामुळे भाजपाविरोधात शिवसेनेने भिवंडी तालुक्यात बंडाचे वातावरण निर्माण केले आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी थेट काँग्रेस नेत्यांशी संधान बांधल्याचे समजते. भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस व शिवसेना युतीची सत्ता आहे. याचा फायदादेखील काँग्रेसचे तिकीट घेणाºया शिवसेना नेत्यांना होण्याची शक्यता आहे.काँग्रेसची परिस्थिती पाहता, या पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी महानगरपालिकेचे काही नगरसेवक व पदाधिकाºयांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे आग्रह धरला असून, त्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये दोन दिवसांपासून ठाण मांडले आहे. टावरे यांना उमेदवारी न मिळाल्यास पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचा धोका ओळखून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाधिकाºयांची गेल्या आठवड्यात बैठक घेऊन त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. भाजपामध्ये विद्यमान खासदार कपील पाटील यांच्यासाठी भाजपातील एका गटाकडून पक्षश्रेष्ठींकडे आग्रह सुरु आहे. त्यामुळे पाटील विरोधकांची गोची झाली आहे़भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी मुंबई भाजपा कार्यालयात पहिल्या फळीच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. त्यामध्ये उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी भाजपातून कपील पाटील यांच्यासह ग्रामिण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे रिंगणात आहेत. या मतदारसंघात नेहमी जातीय राजकारण होत असून, कुणबी सेनासुध्दा आक्रमक झाली आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी न दिल्यास वेगळी वाट धरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसची उमेदवारी उशिरा जाहिर होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ््यात माळ घालणारे हे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhiwandiभिवंडी