शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: ठाण्यातून आनंद परांजपे; तर कल्याणमधून बाबाजी पाटील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 05:44 IST

राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे यांना देणार आव्हान

ठाणे : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा युतीचे संभाव्य उमेदवार व विद्यमान खासदार राजन विचारे यांचा सामना करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार या नात्याने आनंद परांजपे यांना संधी दिली जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीचे संभाव्य उमेदवार व विद्यमान खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्टÑवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचे नाव येथे अंतिम झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या दोघांच्या उमेदवारीची केवळ औपचारिक घोषणा शिल्लक आहे. त्यामुळे आता हळूहळू निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.शिवसेना व भाजपाची युती झाल्याने आणि पाकिस्तानवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही आघाडीत या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांबाबत अनिश्चितता कायम होती. ठाणे लोकसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांनी ही निवडणूक लढवावी, अशी पक्षश्रेष्ठींची प्रारंभी तीव्र इच्छा होती. नाईक यांच्यासाठी तर शेवटच्या क्षणापर्यंत श्रेष्ठी आग्रही होते. परंतु, या दोघांनी राज्याच्या राजकारणातून दूर जाण्यास नम्रपणे नकार दिल्याने अखेर ठाणे लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे यांचे नाव अंतिम झाले आहे. तर, कल्याण लोकसभा मतदारसंघातून बाबाजी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.याचसंदर्भात सोमवारी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, गटनेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि नजीब मुल्ला यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परांजपे आणि पाटील यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे निश्चित झाले होते. परंतु, आव्हाड यांना मुंबईत कामानिमित्त जावे लागल्याने आणि नाईक गैरहजर राहिल्याने त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. मात्र, नवी मुंबईत आव्हाड आणि नाईक यांच्यात सायंकाळी बैठक झाली असून या दोन्ही नावांवर एकमत झाल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे आता केवळ औपचारिक घोषणाच शिल्लक आहे.दोघांनाही मतदारसंघ नवीनआनंद परांजपे यांनी यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, आता ठाणे लोकसभा हा त्यांच्यासाठी नवा मतदारसंघ असणार आहे, तर बाबाजी पाटील ठाणे महापालिकेत नगरसेवक असून त्यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा फारच नवीन आहे. परांजपे यांनी ठाणे शहरात सातत्याने केंद्र सरकारविरोधात केलेल्या आंदोलनांमुळे त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली असल्याचे समजते. दोन्ही उमेदवारांसमोर विद्यमान खासदारांचे आव्हान आहे. ते युतीच्या उमेदवाराला कशी टक्कर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९thaneठाणेkalyanकल्याण