शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Lok Sabha Election 2019: आनंद परांजपे यांना ढकलले चक्रव्यूहात?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:08 PM

बाबाजी पाटील यांचा विधानसभेवर डोळा

- अजित मांडके ठाणे : मागील निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आनंद परांजपे यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी दिल्यास पक्षाने त्यांना चक्रव्यूहात ढकलण्यासारखे आहे, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून बाबाजी पाटील यांना उमेदवारी घोषित होणे, याचा अर्थ कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची दावेदारी भक्कम करण्यासारखे ठरणार आहे.आ. जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत अचानक आनंद परांजपे यांना पाचारण करून निवडणुकीपूर्वी त्यांचा पक्षप्रवेश घडवला होता. त्यानंतर, ठाण्यात शहराध्यक्ष या नात्याने परांजपे यांनी आंदोलने केली. त्यामुळे आता पक्षाने ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. या मतदारसंघातून संजीव नाईक हे मागील वेळेस लढले होते. यावेळी नाईक यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्याचे राष्ट्रवादीतील एका गटाचे म्हणणे आहे, तर संजीव यांना पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. परांजपे यांच्यावर ‘आव्हाड गटाचे’ असा शिक्का बसला असल्याने आता नाईक आपली किती ताकद त्यांच्या पाठीमागे उभी करतात, याबद्दल साशंकता आहे. पवार यांनी ठाण्यातील वेगवेगळ्या दिशेला तोंडे असणाऱ्या नेत्यांमध्ये दिलजमाई घडवून आणली असली, तरी ती किती तकलादू आहे, हे अनेकदा दिसून आले आहे. जितेंद्र आव्हाड यांना परांजपे यांच्याकरिता आपली शक्ती पणाला लावायला लागेल. मात्र, आव्हाड यांची खेळपट्टी ठाणे शहर नसून कळवा-मुंब्रा येथील परिसर आहे. शिवाय, सहा महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्याने आव्हाड यांच्या सढळ पाठिंब्याला मर्यादा आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक आहेत. राबोडी हा राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांचा गड असून मुल्ला यांनीच परांजपे यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी आघाडी उघडली होती. राष्ट्रवादीतील मुल्लांसकट चार नगरसेवक परांजपे यांच्याविरोधात असल्यामुळे मुल्ला हे परांजपे यांना किती आधार देतील, याबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे आनंद यांच्याकरिता आपले वडील दिवंगत खा. प्रकाश परांजपे यांच्या कामाची पुण्याई व आपले नौपाडा वगैरे उच्चभ्रू परिसरात ट्रम्पकार्ड ठरणारे ‘परांजपे’ हे आडनाव आणि स्वच्छ प्रतिमा हीच जमेची बाजू राहणार आहे.कल्याण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असलेले बाबाजी पाटील हे ठाण्यातील नगरसेवक आहेत. पाटील यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. परंतु, कल्याण मतदारसंघ हा त्यांच्यासाठी पूर्णपणे नवा मतदारसंघ आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत यांची प्रतिष्ठा त्या मतदारसंघात पणाला लागलेली असल्याने शिंदे सर्व मार्गांचा अवलंब करतील, अशीच चर्चा आहे. अर्थात, बाबाजी पाटील हेही दिल्लीत जाण्याकरिता उतावीळ असल्याचे संकेत प्राप्त होत नाहीत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सुभाष भोईर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यात पाटील यांना रस आहे. त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक लढवण्यामागे राष्ट्रवादीकडून विधानसभेतील उमेदवारीची हमी मिळवून घेणे, हाच त्यांचा मर्यादित हेतू असू शकेल, अशी चर्चा आहे. त्यांना कळवा आणि मुंब्य्रातील मतदारांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.बाबाजी पाटील यांना कळवा, मुंब्य्रात असलेल्या राष्टÑवादीच्या २६ नगरसेवकांचा फायदा मिळू शकणार आहे. कल्याणमध्ये राष्टÑवादीचे दोनच तर काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. अंबरनाथ नगर परिषदेत राष्टÑवादीचे पाच आणि काँग्रेसचे नऊ नगरसेवक आहेत. पाटील यांच्यामागे हीच कुमक आहे.कल्याणमध्ये राष्टÑवादीची परिस्थिती फारच वाईट असून यापूर्वीच अनेकांनी राष्टÑवादीचे घड्याळ काढून शिवसेना, भाजपात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदही राष्टÑवादीच्या ताब्यात नाही. त्यामुळे बाबाजी यांच्यासाठी ही खूप कठीण लढाई आहे.नगरसेवकांची अत्यल्प कुमकठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास नवी मुंबईवगळता ठाण्यात राष्टÑवादीचे केवळ आठ नगरसेवक आहेत. तर, मीरा-भार्इंदरमध्ये राष्टÑवादी भुईसपाट झाली आहे. त्यामुळे परांजपे हे खरोखरच चक्रव्यूहात अडकले आहेत.कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, असा विचार बाबाजी पाटील यांनी करुन लोकसभा उमेदवारी स्वीकारली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस