शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

लॉकडाऊनमुळे व्यापारी व कामगारांची होणार उपासमार, उल्हासनगरात व्यापाऱ्यात असंतोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 15:03 IST

महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते.

- सदानंद नाईक उल्हासनगर - आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन असे गाजर दाखवून, ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन केल्याचा आरोप व्यापारी संघटनेनी केला. सरकारने व्यापाऱ्यांची फसवणूक केली असून दुकाने बंदमुळे हजारो कामगाराचा रोजगार गेला असून भाजपानेही विरोध करीत निदर्शने केली.  (Lockdown will lead to starvation of traders and workers, dissatisfaction among traders in Ulhasnagar)

देशात औधोगिक शहर म्हणून उल्हासनगरचे नावलौकिक असून शहरात निर्माण होणाऱ्या जीन्स पॅन्टला देशात मागणी आहे. तर जपानी व गजानन मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध असून फर्निचर, बॅग, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तूला मोठी मागणी आहे. अश्या औधोगिक शहरातील दुकाने बंद राहिल्यास दुकानदारासह दुकाना मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ राज्य शासनाने घेतलेल्या लॉकडाऊन निर्णयामुळे येणार असल्याचा आरोप युटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, कार्याध्यक्ष दीपक छतलानी, भाजप व्यापारी मंडळचे अध्यक्ष नरेश दुर्गानी, व्यापारी संघटनेचे परमानंद गिरेजा आदींनी केली. तसेच भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, प्रकाश माखिजा आदींनी शासनाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

 महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते. अखेर पोलीस प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांनी व्यापारी नेत्या सोबत चर्चा करून शासनाचा निर्णय अंतिम असल्याचे सांगून सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार-रविवारी असे दोन दिवस कडक लॉकडाऊन करणार, असे व्यापाऱ्यांनी गृहीत धरले होते. प्रत्यक्षात ३० एप्रिल पर्यंत कडक लोकडाऊन जारी केला असून व्यापारी व दुकानात काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची टीका व्यापारी संघटने कडून केली. आठवड्यातून ५ दिवस लॉकडाऊन काळात दुकानांना उघडण्यास मुभा देण्याची मागणी होत आहे. असे न झाल्यास शहरातील दुकानदार देशोधडीला लागण्याची शक्यता सुमित चक्रवर्ती यांनी व्यक्त केली आहे. 

व्यापारी संघटना मुख्यमंत्री यांना साकडेउल्हासनगर औघोगिक शहर असून लॉकडाऊन मुळे ही ओळख मिटण्याची शक्यता आहे. आठवड्यातून काही दिवस दुकाने सुरू ठेवण्याला मान्यता देण्यासाठी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांची भेट घेऊन साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेने दिलीं. दरम्यान भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्यासह शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांना भेटून शहरातील समस्या बाबत माहिती दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसulhasnagarउल्हासनगर