शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

लॉकडाऊनमुळे कुर्बानीची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 1:16 AM

मुलांनाही मिळाली नाही ईदी । रोजगार बुडाल्याने झाला परिणाम

कुमार बडदे

मुंब्रा :कोरोनामुळे कंटेनमेंट झोन परिसरात कडक लॉकडाऊन पाळला जात असल्याने त्याचा फटका यावर्षी बकरी ईदनिमित्त दिल्या जाणाऱ्या कुर्बानीला बसला. लहान मुलांना हक्काच्या ईदीलाही मुकावे लागले. कंटेनमेंट झोनमधील व्यवहार सुरळीत सुरु झालेले नाहीत. यामुळे अद्यापही अनेकांना मोठ्या प्रमाणावर अर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी बकऱ्यांच्या किमंती श्रेणीनुसार चार ते सहा हजार रुपयांनी वाढल्या होत्या. यामुळे अनेकांनी यावर्षी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुर्बानीची संख्या घटल्याची माहिती इक्बाल शेख याने दिली.

ईदच्या दिवशी घरी भेटण्यासाठी येणाºया लहान मुलांना ईदी (पैसे) देण्याची प्रथा आहे. परंतु लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार दीर्घकाळ बुडाल्याने यावर्षी बहुतांश मोठ्याचा खिसा रिकामा असल्यामुळे त्यांनी लहान मुलांना ईदी देण्याचे टाळले. यामुळे चिमुरड्याचा हिरमोड झाला. मागच्या वर्षीच्या ईदला ईदी म्हणून दीडशे ते दोनशे रुपये मिळालेल्या अनेक चिमुरड्यांना शनिवारी संध्याकाळपर्यंत ईदी म्हणून एक रुपयाही मिळाला नव्हता. दरम्यान सरकारी निर्देशानुसार शनिवारी मुंब्रा येथील नागरीकांनी ईदची नमाज घरांमध्ये अदा केली.देशातील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी दुआँ (प्रार्थना) मागितली. ज्यांनी कुर्बानीसाठी बकरे खरेदी केले होते त्यांनी नमाज नंतर कुर्बानीची प्रथा पार पाडली. ईद निमित्त चौकाचौकांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत शांततेने ईद साजरी केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.भिवंडीत बकरी ईद साधेपणाने साजरीभिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बकरी ईद साधेपणाने साजरी झाली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई असल्याने मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मशिदीत कुणीही जाऊ नये, असे यापूर्वीच सांगण्यात आले होते.

टॅग्स :thaneठाणे