शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: गावी जाऊ इच्छिणाऱ्यांनी गर्दी केल्याने गोंधळ; पोलिसांनी केली मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 06:22 IST

वैद्यकीय तपासणीसाठी डोंबिवलीत झुंबड

डोंबिवली : गावाला जाण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यासाठी केडीएमसीच्या ‘ग’, ‘फ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात बुधवारी नागरिकांनी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. अखेर, पोलिसांनी हटकल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

केडीएमसीच्या कार्यालयांबाहेर पहाटेपासून नागरिकांनी रांग लावलेली होती. त्यात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व राजस्थानमध्ये जाणाºया नागरिकांची जास्त गर्दी होती. प्रभाग क्षेत्र कार्यालयात मात्र प्रवेशद्वारातून एकावेळी पाच ते सात जणांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे आत गर्दी नसली तरीही रस्त्यावर मात्र फतेह अली पथ, मेहता आणि फडके रोडवर नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी त्यांना दुंडके घेत मोजमाप करून अंतर करून दिले होते. त्यानंतरही नागरिक ऐकत नव्हते. अखेरीस पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत त्यांना वेगळे उभे राहण्याचे आवाहन केले. मात्र, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे त्यात हाल झाले.स्थलांतरित कुटुंबाची अखेर पुणे येथे रवानगीलॉकडाउनपूर्वी टिटवाळ्यातील आपल्या नातेवाइकांकडे आल्यानंतर येथेच अडकून पडलेल्या एका कुटुंबाच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना शिधा आणि प्रवासखर्च देत त्यांच्या पुण्यातील मूळ गावी पाठविणाºया कल्याण गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाºयाचे कुटुंबांनी आभार मानले.

पुण्यातील ढेबेवाडी परिसरात राहणारे एक दाम्पत्य आपली पाचवर्षीय मुलगी, मेहुणी आणि सासूसह मोहने येथील आपल्या नातेवाइकांकडे राहायला आले होते. याच दरम्यान, लॉकडाउन जाहीर झाले. ज्या नातेवाइकांकडे हे कुटुंब राहायला आले होते, त्या नातेवाइकांचे घर लहान असल्याने त्यांच्याकडे इतके दिवस कसे राहायचे हा विचार करून या कुटुंबाने मोहने येथील निवारा केंद्रात आश्रय घेतला. या कुटुंबाला स्थानिक नगरसेवक आणि केडीएमसी प्रशासनातर्फे मागील महिनाभरापासून अन्नवाटप करण्यात येत होते.राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी केंद्र शासनाने निर्देश जारी केले. त्यानंतर, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे, पोलीस उपनिरीक्षक मारुती दिघे आदींनी या कुटुंबाची मोहने येथील निवारा केंद्रात भेट घेतली. या कुटुंबाची अडचण लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची केडीएमसीमार्फत वैद्यकीय तपासणी केली. तसेच, त्यांना लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत केली.मोहने येथून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी लागणाºया योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पोलिसांनी या कुटुंबीयांना वाहनाची व्यवस्था करून दिली. तसेच, त्यांना आवश्यक शिधा व प्रवासासाठी मदत देऊन त्यांच्या गावी बुधवारी दुपारच्या सुमारास रवाना केले. त्यामुळे या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस