केडीएमसी हद्दीतील ६२ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:18 IST2020-08-02T01:18:24+5:302020-08-02T01:18:35+5:30
वडवली आटाळी, आंबिवली गावठाण, मांडा पूर्व, मांडा पश्चिम, टिटवाळा गणेश मंदिर, बल्याणी, गाळेगाव, मोहने, मोहने कोळीवाडा, शहाड, गांधारे, बारावे

केडीएमसी हद्दीतील ६२ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ६२ हॉटस्पॉट क्षेत्रांत ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, हॉटस्पॉटवगळता अन्य क्षेत्रांत मिशन बिगिन अगेन असेल, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
वडवली आटाळी, आंबिवली गावठाण, मांडा पूर्व, मांडा पश्चिम, टिटवाळा गणेश मंदिर, बल्याणी, गाळेगाव, मोहने, मोहने कोळीवाडा, शहाड, गांधारे, बारावे, गोदरेज हिल, मिलिंदनगर, घोलपनगर, बिर्ला कॉलेज, वायलेनगर, रामदासवाडी, रामबाग खडक, आधारवाडी, फडके मैदान, बेतूरकरपाडा, ठाणकरपाडा, अहिल्याबाई चौक, सिद्धेश्वर आळी, गोविंदवाडी, बैलबाजार, कोळसेवाडी, लोकग्राम, जरीमरीनगर, संतोषनगर, विजयनगर, आमराई, दुर्गानगर, खडेगोळवली, कांचनगाव, खंबाळपाडा, सावरकर रोड, सारस्वत कॉलनी, पेंडसेनगर, पाथर्ली, बावनचाळ, राजूनगर, गरिबाचावाडा, महाराष्ट्रनगर, नवागाव, कोपर रोड, कोपरगाव, जुनी डोंबिवली, रघूवीरनगर संगीतावाडी, एकतानगर, दत्तनगर, तुकारामनगर, चिंचपाडा, पिसवली, भाल, दावडी, उंबार्ली, चिंचपाडा, आजदे, नांदिवली, सोनारपाडा, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, भोपर, संदप, माणगाव या ६२ हॉटस्पॉटमध्ये ३१ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. हॉटस्पॉट क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील. हॉटस्पॉट क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रांत सर्व प्रकारची दुकाने सम-विषम तारखेनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली राहतील. मात्र मार्केट, मॉल, भाजी मार्केट बंद राहणार आहे.