शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नियम न पाळल्यास ठाण्यात लावणार लॉकडाऊन, पालिका आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 08:31 IST

coronavirus : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत, या विषयीची माहिती देण्यासाठी नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठाणे  : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन हे संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.  कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन साधा सर्दी, ताप आला तरी आधी कोविडची टेस्ट करा, अशा सूचनाही त्यांनी ठाण्यातील खाजगी क्लिनिक आणि रुग्णालयांना दिल्या. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत, या विषयीची माहिती देण्यासाठी नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुसरीकडे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन, रेड झोन, प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंधासाठी गस्ती पथकांची नियुक्ती करण्याबरोबरच नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.  महापालिकेच्या ग्लोबल इॅम्पॅक्ट हब येथील कोविड सेंटरमध्ये सध्या १०७४ बेड उपलब्ध आहेत. या ठिकाणी २२६ आयसीयु बेड, ५५३ ऑक्सिजन बेड, २९५ साधे बेड सज्ज आहेत. नव्याने ज्युपिटर येथील पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी उभारलेले कोविड सेंटर पुढील आठवड्यात ठाणेकरांच्या सेवेत सज्ज होणार असून या ठिकाणी एकूण ११७७ बेड उपलब्ध आहेत. 

गुन्हे दाखल करणारकोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक करवाई करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, लग्न समारंभ, क्लब आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न करणाऱ्यांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार असून लायसन्स रद्द करण्याबरोबर, हॉलला सील ठोकण्याची कारवाईदेखील करण्यात येणार आहे. रिक्षामधून जास्तीचे प्रवासी नेल्यास, रिक्षाचालकांनी मास्क न वापरल्यासही कारवाई करण्यात येईल. शिवाय टीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस