लॉकडाऊनचा असाही केला जातोय सदुउपयोग ब्रम्हांड सोसायटीचा अनोखा उपक्रम, एक हजार नागरीकांनी घेतला घरातूनच आस्वाद, जो पर्यंत लॉकडाऊन असेल तो पर्यंत रहिवाशांना विरंगुळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 06:47 PM2020-04-08T18:47:59+5:302020-04-08T18:49:19+5:30

घोडबंदर भागातील ब्रम्हांड येथील फेज ६ मधील रहिवाशांनी आता कोरोनाशी लढा देण्यासाठी आणि प्रत्येक नागरीकाच्या मनात उर्जा निर्माण करण्यासाठी एक वेगळी शक्कल लढविली आहे. त्यानुसार येथील रहिवाशांना आता रोज एक तास मनोरंजनाची अनोखी मजेवानी चाखण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Lockdown is also being utilized by the Unique Universe Universe, a thousand citizens take home the taste of home, as long as there is lockdown, the residents are delighted. | लॉकडाऊनचा असाही केला जातोय सदुउपयोग ब्रम्हांड सोसायटीचा अनोखा उपक्रम, एक हजार नागरीकांनी घेतला घरातूनच आस्वाद, जो पर्यंत लॉकडाऊन असेल तो पर्यंत रहिवाशांना विरंगुळा

लॉकडाऊनचा असाही केला जातोय सदुउपयोग ब्रम्हांड सोसायटीचा अनोखा उपक्रम, एक हजार नागरीकांनी घेतला घरातूनच आस्वाद, जो पर्यंत लॉकडाऊन असेल तो पर्यंत रहिवाशांना विरंगुळा

Next

अजित मांडके, विशाल हळदे
ठाणे : एकीकडे लॉकडाऊनमुळे नागरीक घरात बसून आधीच वैतागले आहेत, त्यात सकाळी टीव्ही लावली की कोरोना, सांयकाळी लावली तरी कोरोना, मोबाइल उघडला तरी कोरोना त्यामुळे नागरीकांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले आहे, त्यामुळे त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे. परंतु आता याच लॉकडाऊनचा चांगला सदुउपयोग करण्यासाठी घोडबंदर भागातील ब्रम्हाड मधील काही सोसायटीधारकांनी पुढाकार घेतला आहे. येथील ब्रन्हाड फेज ६ मधील रहिवाशांनी येथील तब्बल १ हजार कुटुंबांचे लॉकडाऊन असे पर्यंत मनोरंजन करण्याबरोबर त्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने बुधवार पासून अनोखा उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार बुधवारी पहिल्या दिवशी सोसायटीतील एका सदस्याने सोसायटीच्या आवारातच गिटार हातून घेऊन गाण्यांचा नजराना पेश केला. त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनातील भीती तर कमी झालीच शिवाय कोरोना विरुध्द लढा देण्यासाठी एक प्रकारे उर्जा देखील मिळाली आहे.
                       सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या आजाराने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यातही कोरोनाचा आकडा वाढत आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊनमुळे नागरीकांना दिवसभर घरीच राहावे लागत आहे, त्यामुळे चिडचीड देखील त्यांच्यात सुरु झाली आहे. त्यात सकाळ पासून रात्रभर टिव्ही लावला तरी कोरोनाची भिती सतत मनात घर करुन जात आहे. त्यामुळे मानसिक खच्चीकरण आणि त्यातूनच इतर आजारांनाही यातून आमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी ब्रम्हांड भागातील फेज ६ मधील रहिवाशांनी एक अनोखी शक्कल लढविली आहे. येथील रहिवाशांचे मनोरंजन करण्यासाठी सोसायटीमधील काही नागरीकच पुढे आले आहेत. त्यानुसार ब्रम्हांड फेज ६ मधील ८ इमारती असून त्यामध्ये २१८ फ्लॅट आहेत, तर यामध्ये तब्बल १ हजाराहून अधिक नागरीक वास्तव्य करीत आहेत. त्या सर्वांचे मनोरंजन आता अनोख्या पध्दतीने केले जात आहे.
                 त्याचा शुभारंभ बुधवारी सुमधुर गाण्यांनी झाला, यावेळी सोसायटीमधीलच कृष्णतेजा या तरुणाने सांयकाळी पाच ते सहा या वेळेत हे अनेक सुमधुर गाणी सादर केली. यामध्ये शेवटेच गाणे हम होंगे कामयाब सादर केले आणि या गाण्यावर सोसायटीमधील सर्वांनीच सुर धरला आणि कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही कसे सज्ज आहोत, हे दाखवून दिले. विशेष म्हणजे केवळ गाण्यांचाच नाही तर जुंबा डान्स ते ही एक ते दोघांचा, योगा आदींसह इतरही आरोग्य विषयक उपक्रम, गाणी आदींच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात येथील रहिवाशांचा विरंगुळा केला जाणार असून त्यांच्यात एक सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचाही आमचा प्रयत्न असल्याची माहिती येथील रहिवासी शिवकुमार शेटटी यांनी दिली. लॉकडाऊन वाढल्यानंतरही अशाच प्रकारे रोज एक तास नागरीकांना आपल्या घरातच राहून ही मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तसेच ब्रम्हांड भागातील १८ जेष्ठ नागरीकांच्या घरी जाऊन त्यांना जेवणाची व इतर व्यवस्था करण्याचेही काम यांच्या माध्यमातून सुरु आहे.
 

Web Title: Lockdown is also being utilized by the Unique Universe Universe, a thousand citizens take home the taste of home, as long as there is lockdown, the residents are delighted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.