VIDEO- जव्हार नगर परिषदेवर स्थानिकांचा मोर्चा

By Admin | Updated: February 2, 2017 19:02 IST2017-02-02T17:01:22+5:302017-02-02T19:02:14+5:30

हुसेन मेमन/ऑनलाइन लोकमत जव्हार, दि. 2 - शहरातील महादेव आळी, नवापाडा, सनसेट पॉइंट व दर्गाह आळी परिसरातील शेकडो महिला ...

Locals' campaign on VIDEO-Javar Municipal Council | VIDEO- जव्हार नगर परिषदेवर स्थानिकांचा मोर्चा

VIDEO- जव्हार नगर परिषदेवर स्थानिकांचा मोर्चा

हुसेन मेमन/ऑनलाइन लोकमत

जव्हार, दि. 2 - शहरातील महादेव आळी, नवापाडा, सनसेट पॉइंट व दर्गाह आळी परिसरातील शेकडो महिला व पुरुषांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक कांगणे यांच्या नेतृत्वाखाली जव्हार नगर परिषदेवर डंपिंग ग्राऊंड आणि नळ पाणीपुरवठा अशा विविध समस्या घेऊन मोर्चा काढला.

या सर्व मागण्या जव्हारचे मुख्याधिकारी वैभव विधाते यांना सुनावल्या, मोर्चेकरांचा रोष बघून मुख्याधिका-यांनी तातडीने तुमच्य ल्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन दिले. मुख्याधिकारी यांच्याशी संवाद संपल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपला ताफा नगराध्यक्ष संदीप वैद्य यांच्याकडे वळवला. त्यानंतर मोर्चेक-यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना घेऊन डंपिंग ग्राऊंडजवळ मोर्चा वळवला आणि सत्य परिस्थिती त्यांच्या नजरेत आणून दिली. तसेच मोर्चेक-यांनी स्थानिक नगरसेवकानं जखमेवर फक्त मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचेही आरोप केले आहेत. येत्या आठ दिवसांत तुमच्या समस्या सोडवू, असं आश्वासन नगराध्यक्ष वैद्य यांनी दिली आहे. 
 

https://www.dailymotion.com/video/x844qam

Web Title: Locals' campaign on VIDEO-Javar Municipal Council