शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

"वाढवण बंदराविरोधातील स्थानिकांच्या लढ्याबद्दल शिवसेना गप्प का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 11:05 PM

युवासेनेचे सहसचिव आणि त्यांचे सहकारी स्थानिकांना प्रलोभनं दाखवत असल्याचा आरोप

पालघर: वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल तर बंदर विरोधातील लढ्यात शिवसेना त्यांच्या सोबतीला असेल असे जाहीर वक्तव्य आणि विश्वास शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी जिल्हावासीयांना दिला असताना त्यांच्याच पक्षाचे पालघरमधील युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव परिक्षीत पाटील व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांनी निर्माण केलेल्या एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्थानिकांना प्रलोभने दाखवत असल्याचा आरोप करत त्यांना विरोध केला.स्थानिकांशी बेईमानी कराल तर खबरदार! इथे आलात ते दोन पायाने मात्र जाताना चार पायाने जाल, असा सज्जड दम सोशल मिडियावरून दिला जात असून स्थानिकांनी त्यांना गावातून बाहेर जाण्यास बजावले .शिवसेनेच्या काही वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय त्यांचे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी इतके मोठे पाऊल उचलण्याची हिम्मत करू शकत नसल्याने सेनेच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात असून शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने स्थानिकांच्या संशयाला बळकटी मिळत आहे. ठाण्यातील काही मातब्बर लोकांनी वाढवणच्या आसपासच्या भागातील जमिनी अन्य काही लोकांच्या नावावर खरेदी केल्या असल्याचा सुगावा स्थानिकांना लागला असून या जमिनीचे खरे मालक कोण? याचा शोध घेतला जात आहे.यावरून तर्कवितर्क लढले जात असले तरी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली जात नसल्याने त्यांच्या सभोवताली संशयाचे जाळे गडद होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.स्थानिका मधून सेनेच्या भूमिके विषयी संशय व्यक्त केला जात असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी स्थानिका मधून केली जात आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना