लोकलमधील वादातून फेकली मिरची पूड

By Admin | Updated: June 22, 2017 00:07 IST2017-06-22T00:07:45+5:302017-06-22T00:07:45+5:30

प्रवासादरम्यान झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरूणाने डब्यात मिरची पूड फेकल्याची घटना मंगळवारी रात्री शहाड रेल्वे स्थानकात घडली

Local Pudding Chop Powder | लोकलमधील वादातून फेकली मिरची पूड

लोकलमधील वादातून फेकली मिरची पूड

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : प्रवासादरम्यान झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरूणाने डब्यात मिरची पूड फेकल्याची घटना मंगळवारी रात्री शहाड रेल्वे स्थानकात घडली. पूड डोळ््यात उडाल्याने सुमारे सहा ते सात प्रवाशांना त्रास झाला. त्यांच्यावर उपचार करू न घरी सोडून देण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. आरोपीला पोलिसांनी सीसी टीव्हीच्या आधारे अटक केली आहे.
शहाड रेल्वे स्थानकात लोकल पोहचताच सौरभ इदरीत (२७) या तरूणाने डब्यात मिरची ची पूड फेकली. हा संपूर्ण प्रकार सीसी टीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी फुटेजच्या मदतीने सौरभ याला अटक केली. तो ठाणे येथे कामाला आहे. सौरभ प्रवास करताना त्याचे एकाशी भांडण झाले. आठ ते दहा जणांनी त्याला मारहाण केली. याच रागातून सौरभने त्याच्याशी भांडण करणाऱ्यांवर मिरची पूड टाकली अशी कबूली दिली.

Web Title: Local Pudding Chop Powder