पाण्याच्या टाकीमध्ये पडलेल्या श्वानाला जीवनदान
By जितेंद्र कालेकर | Updated: April 11, 2024 20:04 IST2024-04-11T20:03:53+5:302024-04-11T20:04:53+5:30
या घटनेत अन्य काेणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाण्याच्या टाकीमध्ये पडलेल्या श्वानाला जीवनदान
ठाणे: घोडबंदर रोड, ओवळा नाका परिसरातील हनुमान मंदिराजवळ एका पाण्याच्या टाकीत पडलेल्या श्वानाला जीवदान मिळाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. हा श्वान पाण्याच्या टाकीत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सुमारास ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तातडीने टाकीमध्ये पडलेल्या श्वानाची सुखरूप सुटका करून त्याला जीवदान दिले आहे. या घटनेत अन्य काेणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.