हत्येप्रकरणी २३ जणांची जन्मठेप कायम
By Admin | Updated: December 1, 2015 00:59 IST2015-12-01T00:59:34+5:302015-12-01T00:59:34+5:30
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे तीन जणांची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने २३ जणांना ठोठवलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमावारी योग्य ठरवली. राष्ट्रवादीच्या

हत्येप्रकरणी २३ जणांची जन्मठेप कायम
मुंबई : रायगड जिल्ह्यातील रोहा येथे तीन जणांची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने २३ जणांना ठोठवलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमावारी योग्य ठरवली. राष्ट्रवादीच्या २३ कार्यकर्त्यांना सत्र न्यायालयाने २००५ मध्ये तीन जणांची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याविरोधात सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले. याची सुनावणी हंगामी मुख्य न्या. विजया कापसे-ताहिलरमाणी यांच्या खंडपीठापुढे होती. सरकारी वकिलांनी १३ साक्षीदारांची साक्ष सत्र न्यायालयात नोंदवली असून आरोपींना ठोठावण्यात आलेली शिक्षा योग्य असल्याचे न्या. ताहिलरमाणी यांनी म्हटले. या केसमधील तीन जण कारागृहात शिक्षा भोगत आहेत. २० जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. न्या. ताहिलरमाणी यांनी २० जणांना लगेचच पोलिसांपुढे शरण जाण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, शादेव नेवाशे, शिवराम ओमले आणि उमाजी ओमले यांची हत्या २००४ मध्ये झाली. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. मात्र पक्ष सोडल्याने २३ जणांनी त्यांना मारण्याचा कट अमलात आणला.