उल्हासनगर महापालिका शहर अभियंताला निवेदन, छत्रपती शिवाजी महाराज असा नामउल्लेख करा
By सदानंद नाईक | Updated: October 13, 2023 19:27 IST2023-10-13T19:27:34+5:302023-10-13T19:27:42+5:30
यावेळी जाधव यांनी पूर्ण नावाचा उल्लेख दिशादर्शक फलकांवर करण्याचें आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

उल्हासनगर महापालिका शहर अभियंताला निवेदन, छत्रपती शिवाजी महाराज असा नामउल्लेख करा
उल्हासनगर: कॅम्प नं-३ येथील चौकाच्या दिशा निर्देशक फलकावर छत्रपती शिवाजी महाराज चौक असा नावाचा नामउल्लेख करण्याचे निवेदन युवासेनेने महापालिका शहर अभियंता संदीप जाधव यांना दिले. यावेळी जाधव यांनी पूर्ण नावाचा उल्लेख दिशादर्शक फलकांवर करण्याचें आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दिशा निर्देशक फलकवर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे पूर्ण नाव लिहण्याऐवजी शिवाजी चौक असे लीहण्यात आले. महाराजांचा एकेरी उल्लेख नामफलकावर केल्याबाबत युवासेनेचे पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक असे लिहण्याचे निवेदन महापालिका शहर अभियंता संदीप जाधव यांना दिले आहे.
येत्या ७ दिवसाच्या आत नामफलकावरील नाव दुरुस्त करून छत्रपती शिवाजी महाराज चौक असे लिहन्यात येवावे. असे निवेदन म्हटले आहे. शहर युवासेनेचे सुशील पवार, सुजित पंजाबी, विकी जोशी, कल्याण समन्वय ॲड प्रवीण करिरा, ऋतिक करोटिया, अविनाश निकम यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.